brahmagiri  Sakal
नाशिक

Nashik Brahmagiri News : ब्रह्मगिरी उत्खननाची हरित लवादाकडून चौकशी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Brahmagiri News : त्र्यंबकेश्वर येथील विविध नद्या-उपनद्यांचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताचे उत्खनन करून नद्यांचे स्रोतच नष्ट करण्याची हरकत घेत राष्ट्रीय हरित लवादात दाखल झालेल्या याचिकेत लवादाने संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (Brahmagiri mining to be probed by green arbitrator nashik news)

त्र्यंबकेश्वर येथील पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी हरित लवादात त्र्यंबकेश्वर येथील सीमांकनासाठी याचिका दाखल केली असून, त्यात सीमांकनापूर्वी तेथील उत्खननाचा मुद्दा पुढे आला आहे. त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वताच्या जैवसंपदेकडे दुर्लक्ष होत असल्याने तेथील अनागोंदीची दखल घेत ब्रह्मगिरीचे सीमांकन व्हावे, ही याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

त्या अनुषंगाने तेथील उत्खननाचा मुद्दा पुढे आला आहे. तेथील विनापरवाना सर्रास सुरू असलेल्या उत्खनन आणि बांधकामाबाबत तक्रार करताना याचिकाकर्त्यांनी हरित लवादाकडे केलेली याचिका दाखल करून घेतली.

लवादाने संबंधितांना नोटिसा काढण्याचे आदेश बजावले.

यात नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्र्यंबकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी, मुख्य वनसंरक्षक (नाशिक) यांची समिती स्थापन करीत संबंधित समितीकडून स्थळ पाहणी करून सविस्तर अहवाल मागविला आहे. अॅड. लक्ष्यवेध ओढेकर आणि इंद्रायणी पटणी याचिकाकर्त्यांतर्फे कामकाज पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT