Son-in-law's Donkey Procession (File Photo)
Son-in-law's Donkey Procession (File Photo) esakal
नाशिक

Unique Tradition : "जावयाची गाढवावरून धिंड" प्रथा मोडीत; ना मिळाले गाढव अन् ना मिळाला जावई !!!

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : वडांगळी येथील ब्रिटीश काळापासून चालत आलेली " जावयाची गाढवावरून धिंड " प्रथा यावेळी मोडीत निघाली. सुमारे शे- सव्वाशे वर्षांपासून वडांगळी ग्रामस्थ जावयाची गाढवावर बसवून सवाद्य ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून नंतर त्याचा यथोचित सत्कार करून बोळवण करतात.

कोरोनाच्या काळात ही धिंड निघाली नाही. त्या अगोदर अपरिहार्य कारणास्तव धिंड निघाली नाही,असे दोन तीन अपवाद वगळता आजतागायत अखंडपणे जावयाची धिंड काढण्यात वडांगळीकर यशस्वी ठरले. परंतु यावेळी कुठे माशी शिंकली कळायला मार्ग नाही. (Breaking culture ritual of son in law procession on donkey in vadangali nashik news)

परंतु ही परंपरा खंडित झाल्याने अनेकांना नवल वाटले. ज्या धिंडीचे महाराष्ट्रात नामांकित वृतवाहिन्या, वृत्तपत्रे, समाज माध्यमे आवर्जून दखल घेतात अशी प्रथा अचानक खंडित का झाली याचा शोध घेत असताना अशी माहिती मिळाली की, होळी ते रंगपंचमी या काळात कोणत्याही परिस्थितीत गाढव शोधून आणून येन केन प्रकारे जावई शोधन्यात येऊन त्याची धिंड काढली जातेच.

पण यावेळेस तरुणांची उदासीनता, ग्रामस्थांच्या सहभागाचा अभाव आणि महत्वाचे कारण आज सिन्नरला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचे मतदान असल्याने वडांगळी मधील सरपंच, आजी माजी आमदारांचे समर्थक, कार्यकर्ते सर्वच निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी गेले होते.

आजी, माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे दोन्ही गटाचे समर्थक सिन्नरला सकाळ पासूनच तळ ठोकून होते. त्यामुळे गावात गाढव व जावई शोधण्यासाठी कोणतीच यंत्रणा कामाला लागली नाही. सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे धिंडी साठी खर्च कोणी करायचा याची चर्चा गावात होती.

ग्रामस्थांनी मनावर घेतले असतेतर त्यांच्या ट्रस्ट मधून पैसे देता आले असते, नाहीतर या पाच सहा दिवसात वर्गणी करून मोठा निधी उभारता आला असता. पण ग्रामस्थांसह तरुणांची मानसिकता नसल्यामुळे परंपरा मोडीत निघण्याची नामुष्की वडांगळीकरांवर ओढवली ही खंत आहे.

वडांगळी मध्ये मोठ्या प्रमाणात सतीमाता सामतदादा तसेच अनेक सामुदायिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे होतात त्यासाठी निधी कमी पडत नाही, मग धिंडी साठीच कोठे घोडे अडले हा संशोधनाचा भाग आहे.

एखादा प्रायोजक शोधता आला असता पण ग्रामस्थांची उदासीनता, नियोजन शुन्यता, तरुणांचा निष्काळजीपणा ही प्रथा मोडीत निघण्यासाठी कारणीभूत ठरली असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.

त्यात आपण पुढाकार घेऊन पैसे घेऊनही प्रसिध्दी मात्र दुसऱ्यालाच मिळते अशी खदखद कानावर आली. काहीही असो त्यामुळे अनेक प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती, त्यांचा मात्र हिरमोड झाला. सकाळ पासून वडांगळीत निघणाऱ्या जावयाच्या धिंडीकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT