burglary News esakal
नाशिक

Crime Update : काठेगल्लीत घर फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : घर बंद असल्याची संधी साधत पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (Breaking house in KatheGalli two lakh worth goods stolen nashik crime Latest Marathi News)

काठे गल्ली श्रीसमर्थनगर येथील विनीत वाघ कुटुंबीयांसह सोमवारी (ता. १२) कुटुंबीयांसह मुंबई येथे नातेवाइकांकडे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात संशयितांनी घरातून ४५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३८ हजारांची रोख रक्कम असा सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज चोरून नेला. त्यांच्या शेजारच्यांचा लक्षात आल्याने त्यांनी मंगळवारी (ता. १३) वाघ यांना फोनवरून माहिती दिली. त्यांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली.

दोन संशयित येताना आणि बाहेर जाताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. त्यानंतर वाघ यांच्या तक्रारीवरून अज्ञात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. काठे गल्ली परिसरात वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चारित्र्य पडताळणी दाखला कसा काढायचा? महा-ई-सेवा केंद्रातून ‘या’ वेबसाईटवर करा अर्ज, १५९ रुपयांच्या शुल्कात ७ दिवसांत मिळेल दाखला, वाचा...

आजचे पंचांग १० ऑगस्ट २०२६! सोमप्रदोषासह जाणून घ्या शुभ-अशुभ वेळा

Falahari Sandwich: उपवासात रोज साबुदाणा नको! झटपट बनवा चटपटीत फलाहारी सँडविच; चवीसोबत पोटही राहील भरलेलं

आजचे राशिभविष्य - १० ऑगस्ट २०२६

ढिंग टांग : आखरी रस्ता : एक पाहणी..!

SCROLL FOR NEXT