नाशिक

स्तनाच्या कर्करोगावर दीर्घकाळ नियंत्रण शक्य : डॉ. घरोटे

CD
फोटो - NSK26H31636 नाशिक : स्तनाच्या कर्करोगावरील आधुनिक उपचार आणि उपचारक्रमावर आयोजित आंतरराष्ट्रीय प्रगत अभ्यासक्रमात विविध देशांतील डॉक्टरांसमवेत नाशिकचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. मुकुल घरोटे. स्तनाच्या कर्करोगावर दीर्घकाळ नियंत्रण शक्य : डॉ. घरोटे सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.७ : स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णाला योग्य वेळी, योग्य उपचार आणि योग्य क्रमाने देणे ही आधुनिक उपचारांची दिशा असून त्याद्वारे या आजारावर दीर्घकाळ नियंत्रण शक्य आहे, असे मत कर्करोगतज्ज्ञ डॉ. मुकुल घरोटे यांनी नोंदविले. तसेच स्तनात गाठ, आकारात बदल, त्वचा किंवा स्तनाग्रातील बदल जाणवल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. मेटास्टॅटिक अर्थात शरीराच्या अन्य भागांत पसरलेल्या स्तनाच्या कर्करोगावरील आधुनिक उपचार आणि उपचारक्रमावर आयोजित आंतरराष्ट्रीय प्रगत अभ्यासक्रमात नाशिकचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. मुकुल घरोटे यांनी निमंत्रित म्हणून सहभाग घेतला. या वेळी जगभरातील कर्करोगतज्ज्ञांनी रुग्णानुसार उपचारांची निवड व योग्य उपचार नियोजनावर चर्चा केली. जगातील स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णभारापैकी सुमारे निम्मा भार आशिया खंडावर असून, भारतासह अनेक देशांत निदान उशिरा होते. त्यामुळे लवकर निदान आणि वेळेत उपचार आवश्यक आहेत. गेल्या काही वर्षांत लक्ष्यित औषधे, संप्रेरकाविरोधी उपचार आणि रोगप्रतिकारशक्तीवर आधारित उपचारांमुळे मेटास्टॅटिक स्तनाच्या कर्करोगावर दीर्घकाळ नियंत्रण शक्य झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India A vs UAE: आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये उद्या भारतासमोर यूएईचं आव्हान! सेमीफायनलचं तिकीट पणाला, वैभवच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष

COP31 Climate Summit Collapse Turkey : तुर्कीयेमधील संयुक्त राष्ट्रांची 'कॉप ३१' हवामान परिषद फिस्कटली! जीवाश्म इंधनांच्या मुद्द्यावरून मोठे मतभेद, मुख्य कराराविनाच चर्चा संपली

Manoj Jarange: मनोज जरांगें पुन्हा आक्रमक! ७ डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा; मराठा बांधवांना काय केले आवाहन?

Latest Marathi News Live Update : लातूरमध्ये पोलीस कोठडीत २१ वर्षीय तरुणाची आत्महत्या? अटकेच्या दुसऱ्याच दिवशी उचलले टोकाचे पाऊल

५ डिसेंबरला केतूचं राशीपरिवर्तन! पुढील १८ महिने ३ राशींची चांदी; बँक बॅलन्स झपाट्याने वाढणार

SCROLL FOR NEXT