bride drives a bullock cart 
नाशिक

बोहल्यावर चढण्यापूर्वी ‘तिने’ चालवली बैलगाडी

गोविंद अहिरे

नरकोळ (जि. नाशिक) : कोरोना संकटामुळे संपूर्ण जगाचीच घडी विस्कटली आहे. सर्वत्र नकारात्मक वातावरण पहायला मिळत आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाउन करण्यात आल्याने अनेक लग्नसोहळे लांबणीवर पडले होते. दरम्यान अलिकडे बऱ्याच ठिकाणी अनोखे विवाह सोहळे साजरे झाल्याचे बघायला मिळतात. हेलिकॉप्टरमधून वधुला नेले जात असल्याचे चित्र अनेकदा बघायला मिळते. मात्र, बागलाण तालुक्यात वधूने बैलगाडी चालवून उपस्थितांचे लक्ष वेधले. (bride drives a bullock cart in kersane nashik)

जीवनातील सर्वात महत्वाचा आनंदाचा क्षण हा विवाहसोहळ्याचा असतो. या सोहळ्यात कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी होतात. मुलगा, मुलगी समान मानून सर्व कार्य धुमधडाक्यात होते. असाच एक विवाहसोहळा केरसाणे (ता. बागलाण येथे पार पडला. मांडवाच्या दिवशी शेतकरी कन्येने मांडवाची बैलगाडी चालवून उपस्थितांना अवाक्‌ केले. आयटी इंजिनिअर असलेल्या या वधूने चक्क बैलांचा कासरा हातात घेऊन बैलगाडी चालवली. त्यामुळे या कृषिकन्येचे सर्वांनी कौतूक केले.

मी आयटी इंजिनिअर असली तरी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. या उद्देशाने मला बैलगाडी चालविताना फार आनंद झाला. तोही माझ्या विवाह सोहळ्याच्या दिवशी. हा क्षण मी कधीही विसरू शकत नाही.

- प्राजक्ता अहिरे, नववधू, केरसाणे (ता. सटाणा)

(bride drives a bullock cart in narkol nashik)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT