Vehicles passing through the British-era tunnel directly to Kasara esakal
नाशिक

Kasara Ghat Tunnel: कसारा घाटातील ब्रिटिशकालीन बोगदा खुला! वाहनचालकांचा 12 Kmचा फेरा अन वेळही वाचणार

पोपट गवांदे

Kasara Ghat Tunnel : जव्हार, मोखाडा, खोडाळा, विहिगावसह १२ गाव पाड्यातील चाकरमानी, ग्रामस्थ व वाहन चालकांना आता ब्रिटिशकालीन बोगद्यातून थेट नवीन कसारा घाटमार्गे कसारा, कल्याणकडे जाण्यासाठी रस्ता खुला करण्यात आला आहे.

त्यामुळे अनेक वर्षांपासून जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या गोर गरीब आदिवासी बांधवांचा प्रवास आता सुखकर झाला आहे. (British era tunnel in Kasara Ghat open 12 Km round trip of motorists will save time nashik news)

जव्हार फाट्याहून कसाराकडे लोकल पकडण्यासाठी, बाजारहाट, येण्या -जाण्यासाठी किंवा मुबई ठाणे येथे कामधंद्यासाठी अनेक ग्रामस्थ चाकर मानी, दुचाकी, एस टी बससह खासगी वाहनांनी कसारा येथे जातात.

तिथून लोकलने पुढील प्रवास करतात. परंतु हा प्रवास करताना हे वाहतूकदार, वाहन चालक जव्हार फाटामार्गे मुंबई नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटातून विरुद्ध बाजूने दोन किलोमीटरचा प्रवास करून कसाराकडे जाणाऱ्या नाशिक मुंबई लेनवर यायचे.

परिणामी या राँग साइड प्रवासामुळे अनेक अपघात जव्हार फाटा ते आंबा पॉइंट या दरम्यान होत होते. या प्रकरणी महामार्ग पोलिस घोटी केंद्राचे अधिकारी अमोल वालझडे यांनी पर्यायी रस्त्यासाठी वनविभाग यांच्याकडे मृतावस्थेत असलेल्या ब्रिटिश काळातील बोगदाबाबत चर्चा करून पाहणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान जव्हारफाट्या लागतच असलेला बोगदा थेट नवीन घाटात उतरत असल्याचे निदर्शनात आले. दरम्यान तिन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या बोगद्यातील रस्त्याची दुरुस्ती करून तात्पुरत्या स्वरूपात जव्हार फाट्याहून कसाराकडे येणाऱ्या वाहनांना पर्यायी रस्ता खुला केला.

परिणामी वाहनचालकांचा १२ किलो मीटरचा फेरा आणि वेळही वाचणार आहे. तसेच भविष्यात कसारा घाटात काही आपत्ती उद्भवली तर हा पर्यायी मार्ग नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यामुळे इगतपुरी, कसारा व जव्हार येथील प्रवासी वर्गाने समाधान मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT