chicken.jpg 
नाशिक

ब्रॉयलर कोंबडी किलोच्या भावाने गाठली शंभरी...मात्र तरीही 'इतक्या' कोटींचा दणका

महेंद्र महाजन : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाचा संबंध चिकनशी जोडण्याच्या अफवेमुळे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने भाव गडगडले. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये व या महिन्याचा पंधरवडा या कालावधीत राज्यातील उत्पादकांना 990 कोटींचा दणका बसला. दरम्यान, 2 एप्रिलपासून चिकनची अफवेतून हळूहळू सुटका होऊन एक किलोच्या जिवंत ब्रॉयलर कोंबडीच्या भावाने शंभरी गाठली आहे. दरम्यानच्या परिस्थितीमुळे उत्पादन 50 टक्‍क्‍यांनी घटले, तर खेळते भांडवल संपल्याने लवकर ब्रॉयलर कोंबड्यांचे उत्पादन वाढेल, अशी स्थिती तूर्त दिसत नसल्याचे चित्र आहे. 

साडेचार कोटी कोंबड्यांचे राज्यात उत्पादन

शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील ग्राहकांनी चिकनला स्पर्श करणे टाळले. त्यामुळे कुक्‍कुटपालन उद्योगाला दणका बसला. जानेवारीमध्ये किलोचा भाव 80 रुपये होता. 3 फेब्रुवारी 65, 11 फेब्रुवारीला 50 रुपये असा भाव घसरत असताना 13 फेब्रुवारीला 30 रुपये किलो भावाने कोंबडी विकणे मुश्‍कील झाले. एक किलो कोंबडीच्या उत्पादनासाठी 70 रुपये खर्च येत असताना फेब्रुवारीमध्ये सरासरी 45, तर मार्चमध्ये 16 रुपये किलो असा भाव मिळाला. महिन्याला सर्वसाधारणपणे साडेचार कोटी कोंबड्यांचे राज्यात उत्पादन होते. उत्पादन खर्च आणि मिळालेल्या भावाचा विचार करता, फेब्रुवारीमध्ये 270, तर मार्चमध्ये 500 कोटींचे नुकसान उत्पादकांना सहन करावे लागले. 1 एप्रिलला पाच रुपये किलो असा भाव राहिला. दुसऱ्या दिवशी 33 रुपये किलो भावाने कोंबड्या विकल्या गेल्या आणि भाव सुधारण्याचा आशावाद उत्पादकांमध्ये तयार झाला. तरीपण उत्पादन खर्च आणि भावाचा विचार करता 220 कोटींच्या नुकसानीची भर गुरुवार (ता. 16)पर्यंत पडली. 

गुजरातची सीमा खुली 

मराठवाडा आणि ग्रामीण भागामध्ये ब्रॉयलर कोंबड्यांची मागणी वाढली आहे. एरवी 15 लाख कोंबड्या दिवसाला विकल्या जात असताना आता मात्र दिवसाला साडेसात लाख कोंबड्या विक्रीसाठी बाजारात दाखल होताहेत. मुंबई-पुण्यामधील खप वाढला आहे. अशातच गुजरातची सीमा खुली झाली असल्याने सुरतला कोंबड्या जाऊ लागल्या आहेत. मुंबईची शनिवार, रविवारची दिवसाची मागणी पाच ते सात लाख कोंबड्यांची असते. आता हीच मागणी चार लाख कोंबड्यांपर्यंत आहे. तरीही तेवढ्या कोंबड्या विक्रीसाठी जात नाहीत. पन्नास टक्के कोंबड्या मुंबईकरांसाठी पाठविल्या जातात. गेल्या वर्षी उन्हाळ्यात किलोचा भाव 75 रुपये असा होता. 

लॉकडाउन संपल्यानंतर नवीन अधिकची अंडी उबविण्यासाठी ठेवली जातील. त्यातून उपलब्ध होणाऱ्या पिल्लांच्या संगोपनासाठी 40 दिवस लागतील. म्हणजे, मागणीएवढ्या कोंबड्या विकत घेण्याची अवस्था जुलैपर्यंत तयार होईल. उत्पादन घटण्यामागे शेतकऱ्यांचे संपलेले खेळते भांडवल, पिल्लांच्या संख्येत केलेली घट आणि उन्हाळ्यामुळे कमी वजन मिळणे अशी कारणे आहेत. - उद्धव आहेर, अध्यक्ष, आनंद ऍग्रो ग्रुप  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT