Damage done to the car. esakal
नाशिक

Nashik Crime: पंचवटीत चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : घराबाहेर लावलेल्या चारचाकी वाहनाच्या काचांवर दगडफेक करून वाहनाचे नुकसान केल्याची घटना घडली आहे.

दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी दगडफेक करत वाहनांच्या काचा फोडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्यांचा शोध सुरू केला आहे. (broke windows of car in Panchavati Nashik Crime)

शिंदेनगर परिसरातील कॉलनी रस्त्यावर असलेल्या बालाजी हाईट्स येथे मंगळवारी (ता. १५) पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन संशयितांनी काहीएक कारण नसताना वाहनांच्या काचांवर दगड मारून नुकसान केले.

काचा फोडल्याचा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी घराबाहेर डोकावून पाहिले असता, अज्ञात तिघे संशयित दगड फेकून दुचाकीवरून पळून गेल्याचे दिल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

या घटनेत अॅड. देवदत्त जायखेडकर यांची कार (एमएच- १५- बीआर- ३५१८) आणि एका इनोव्हा कारची काच फोडण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून या परिसरात अल्पवयीनांसह टवाळखोर तरुणांचे टोळके घोळका करून दहशत निर्माण करत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहे.

अशा टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई करून परिसरात गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी देवदत्त श्रीकृष्ण जायखेडकर (४०, रा. बालाजी हाइट्स) यांनी तक्रार दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking: आजपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही एलपीजी सिलिंडर;ताबडतोब करा 'हे' काम

सायप्रसकडे फक्त पर्यटनस्थळ म्हणून पाहू नका; भारतीय व्यवसायांसाठी मोठी संधी, विराज कुलकर्णींचा दावा

Hockey World Cup : पाकिस्तानचा मुर्खपणा, महत्त्वाचे सामान न घेताच खेळायला आले; रेफरीने बरोबर धारेवर धरले; माजी कर्णधार म्हणाला...

आईने इस्लाम स्वीकारला आणि आम्हालाही... शर्मिला टागोर यांची लेक सबा पतौडीचा खुलासा; म्हणाली - आम्ही कधीही मंदीरात...

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

SCROLL FOR NEXT