नाशिक

बहिणीला आणायला निघालेल्या भावाचा अपघाती मृत्यु

CD
NSK26H31373 : ललित झवर --------- बहिणीला आणायला निघालेल्या भावाचा अपघातात मृत्यू पाळधी-तरसोद ‘बायपास’वर कंटेनरची दुचाकीला धडक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी माहेरी येणाऱ्या बहिणीला घेण्यासाठी जळगावला येत असलेल्या ललित मनोहर झवर (वय ३०, रा. पाळधी, ता. धरणगाव, हल्ली रा. प्रेमनगर, जळगाव) यांच्या दुचाकीला कंटेनरने धडक दिली. या भीषण अपघातात ललित पुलावरून खाली फेकले गेल्याने जागीच ठार झाले. पाळधी-तरसोद बायपासवरील टाकळी फाट्यानजीक रविवारी (ता. ४) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. पिंप्राळा परिसरात राहणारे विमा एजंट ललित झवर यांच्या आजोबांचे सोमवारी (ता. ५) वर्षश्राद्ध असल्याने कुटुंबीय पाळधी येथे मूळ गावी गेले होते. वर्षश्राद्धासाठी ललित यांची बहीण येणार असल्याने तिला घेण्यासाठी ते दुचाकीने जळगाव रेल्वेस्थानकाकडे निघाले होते. पाळधीहून बायपासमार्गे येत असताना टाकळी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला कंटेनरने जोरदार धडक दिली. धडकेने ललित पुलावरून खाली फेकले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थ व वाहनधारकांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. चौकट जिल्‍हा रुग्णालयात गर्दी घटनेची माहिती मिळताच झवर यांचे नातेवाईक व मित्र परिवाराने रुग्णालयात धाव घेतली. ललित झवर यांच्या अपघाती मृत्यूमुळे या कुटुंबाचा आधार हरवला आहे. एकुलत्या एक मुलाच्या अकाली जाण्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पडीक जमीनीबद्दलच्या विधानाचा विपर्यास, बावनकुळेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, शेतकऱ्यांशी संबंध नाही

IND vs NZ 2nd Test: विजयाचा 'घास' गेला, आता भारत-न्यूझीलंड दुसरा सामना केव्हा? करो वा मरो मॅच कुठे Live दिसणार?

परदेशात प्रिया बेर्डेंना चुकीची वागणूक, पाठीशी उभे राहिले जॉनी लिव्हर; अख्ख शूटिंग थांबवलं, शेवटी मॅनेजरने...

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा? विश लिस्टवर म्हणाले...

Latest Marathi News Live Update : मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड घाटात दोन ट्रकचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT