बहिणीला वाढदिवसाची भेट
देत भावाने केली आत्महत्या
----
कुसुंबा येथील दुर्दैवी घटनेने गावात हळहळ
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ११ : बहिणीचा वाढदिवस असल्याने तिला पैसे देऊन कपडे घेण्यासाठी बाजारात पाठवून हितेश संदीप कोळी (वय १९, रा. कुसुंबा, ता.जळगाव) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शनिवारी (ता.१०) कुसुंबा येथे घडली.
चटई कारखान्यात कामाला असलेल्या हितेश कोळी याच्या बहिणीचा रविवारी (ता.११) वाढदिवस असल्याने त्याने तिला पैसे दिले. शिवाय बहीण व आईला कपडे घेण्यासाठी बाजारातही पाठविले. त्यानंतर घरात एकटाच असताना हितेशने गळफास घेतला. रात्री आई व बहीण घरी आले तेव्हा ही घटना लक्षात आली. त्यावेळी तरुणाला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना घडली त्यावेळी तरुणाचे वडील नाशिक येथे गेले होते. मृताच्या पश्चात आईवडील, बहीण, लहान भाऊ असा परिवार आहे. या घटनेने गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.