नाशिक

जीजाऊनगर, वाघनगर येथे वर्षावास समारोपजीजाऊनगर, वाघनगर येथे वर्षावास समारोप

CD
NSK26H34643 जळगाव : वर्षावास कार्यक्रमात पूज्य भदंत बोधीधम्म थेरो यांच्यासोबत उपासकल उपासिका. ------- जिजाऊनगर, वाघनगर येथे वर्षावास समारोप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : जिजाऊनगर वाघननर येथील सम्राट अशोक ध्यानसाधना केंद्र येथे मागील तीन महिन्यांपासून धम्मांचल येथील पूज्य भदंत बोधीधम्म थेरो आणि छत्रपती संभाजीनगर (मूळचे मुळावा) येथील पूज्य भदंत धम्मबोधी महाथेरो यांच्या वर्षावास कालावधीत धम्मपद या पवित्र ग्रंथावर आधारित धम्मोपदेशनांचे आयोजन करण्यात आले होते. भीमकन्या महिला मंडळातर्फे विविध कार्यक्रम झाले. केशराई हॉल येथे धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. वर्षावास कार्यक्रमाच्य़ा समारोपप्रसंगी भदंत बोधीधम्म थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म रॅली काढण्यात आली. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती रथात सजावट करुन विराजमान केल्या होत्या. जिजाऊनगर- वाघनगर येथील भीमकन्या महिला मंडळ आणि परिसरातील बौद्ध उपासक, उपासिका बालक बालिका शुभ्र वस्त्र परिधान करुन रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीप्रसंगी परिसरात ‘बुध्दं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि, संघं सरणं गच्छामि’च्या स्वरांने परिसर गजबजून गेला. रॅलीनंतर भिक्खू संघाला भोजनदान दिले. त्यानंतर भिक्खु संघाने उपस्थित बौद्ध उपासक –उपासिका बालक व बालिका यांना भिक्खू संघाने धम्मदेशना दिली. याप्रसंगी चिवर दान या बौद्ध कालापासून चालत आलेल्या प्रसंगाचे वर्णन केले. धम्मबोधी महाथेरो यांनीही धम्मदेशना दिली. भिक्खू संघाला भीमकन्याच्या विविध पदाधिकारी यांनी चिवरदान केले. राकेश पाटील यांच्याकडून रॅलीसाठी ट्रॅक्टर मोफत उपलब्ध करुन दिला. बापू साळंके, प्रा. अशोक हनवते, मा. विनोद सपकाळे, भीमकन्या महिला मंडळाच्या विविध पदाधिकारी आणि परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका व बालक बालिका यांनी सक्रिय सहभाग घेऊन वर्षावास समारोपाचा कार्यक्रम यशस्वी केला.

अमेरिकेत खळबळ! पत्नीने AIच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा कट? ChatGPTच्या विरोधात खटला दाखल

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Latest Marathi News Live Update: पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल

Rohit Pathare case : २४ वर्षीय रोहित पठारेला घरातून उचललं, झाडाला बांधून बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT