नाशिक

दिवाळीच्या सुटीत दोन घरफोड्या; ९१ हजारांचा ऐवज लंपास

CD
सेकंड मेन -- (घरफोडीचे स्केच वापरता येईल) --- शहरात बंद घरांवर चोरट्यांचा डल्ला कुसुंबा, राजीव गांधीनगरातील घटना; ९१ हजारांचा ऐवज लंपास सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : दिवाळीच्या सुट्यांमध्ये नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. कुसुंबा आणि राजीव गांधीनगर येथे झालेल्या या घरफोड्यांमध्ये रोख रकमेसह दागिने आणि गॅस सिलिंडर असा एकूण ९१ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुसुंबा येथील गोपीचंद धोंडू पाटील (वय ५१) हे खासगी नोकरीला असून, दिवाळीच्या सुटीनिमित्त मंगळवारी (ता. १०) कुटुंबीयांसह अमळनेर येथे मूळ गावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील बाजूने किचनच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील ५० हजार रुपयांची रोकड आणि साडेतीन तोळ्यांचे कर्णफुले असा एकूण ६९ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, १२ नोव्हेंबरला शेजाऱ्यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी तत्काळ पाटील यांना माहिती दिली. पाटील यांनी घरी येऊन पाहणी केली असता घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चौकट गॅस सिलिंडरही पळविले दुसरी घटना राजीव गांधीनगर येथे घडली. सुनीता प्रमोद मोरे (वय ४०) या बाहेरगावी गेलेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या घराची कडी व कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील २० हजार रुपयांची रोकड आणि गॅस सिलिंडर असा एकूण २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी मोरे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दोन्ही घटनांप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

IND vs NZ 4th ODI: विराट कोहली शून्यावर क्लिनबोल्ड अन् झाली सचिन तेंडुलकरच्या 'नकोशा विक्रम'शी केली बरोबरी

NTA Reform: NEET मधील पेपरफुटीनंतर मोठा निर्णय; गैरप्रकार रोखण्यासाठी आता थेट लष्करी अधिकाऱ्यांना...

IND vs NZ: शेवटच्या वनडेत खेळणार नाही मॅट हेन्री, विराट कोहलीने जर्सी भेटही दिली; पण कारण काय?

SCROLL FOR NEXT