burglary Google
नाशिक

नाशिकच्या सराफ बाजारात धाडसी घरफोडी

विनोद बेदरकर

नाशिक : सराफ बाजार परिसरात असलेल्या चिंतामणी सोसायटी मध्ये रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एका घरावर धाडसी घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. कायम ४३ सीसीटीव्हींची नजर, सुरक्षारक्षक आणि हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असलेल्या चिंतामणी सोसायटीत रविवारी (ता.२६) मध्यरात्री धाडसी चोरीमुळे सराफ बाजारातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (burglary at midnight in the bullion market area of ​​Nashik)

चोरट्यांनी चोरी करताना सोसायटीतील सर्व फ्लॅटला बाहेरुन कडी लावली होती. चोरट्यांनी बंद फ्लॅटचा कोयडा तोडून चांदीची गणेशमूर्ती, देवाच्या पुजेची सोने व चांदीची उपकरणे, मुर्त्या, तीन कॅमेरे, तवा, चार्जर, शूज, तांब्याच्या वस्तू, कडई, नवीन कपडे लंपास केल्या आहेत.

सराफ बाजारातील नगरकर लेनमधील चिंतामणी सोसायटीतील पहिल्या मजल्यावर अनिल चव्हाण यांचा फ्लॅट आहे. त्यांचे कुटुंबिय दुसऱ्या इमारतीतील फ्लॅटमध्ये राहतात. ते रविवारी (ता.२६) सायंकाळी पाचला फ्लॅट बंद करुन घरी गेले होते. सोमवारी (ता.२७) सकाळी सहाला वृत्तपत्र विक्रेत्याला या भागातील सर्वांच्या फ्लॅटला बाहेरुन कडी लावल्याचे दिसले. त्याने सोसायटीतील फ्लॅटधारकांना सांगितले. त्यातून चव्हाण यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले.

चोरट्यांनी घरातील सर्व संसारोपयोगी साहित्यांची उचकापाचक केली होती. त्यामुळे सर्वत्र साहित्य अस्तवस्त पडले. चोरट्यांनी घरातून सोने व चांदीची देवाची उपकरणांसह नवीन कपडे, तवा, कॅमेरे लंपास केले. चोरच्यांनी चोरीचा माल नेण्यासाठी चव्हाणांच्या मुलांची बॅगसुद्धा नेली. जाताना जुना सॅण्डल ठेवून नवीन बुट घालून गेल्याचे समोर आले आहे. चोरीची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजचा आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

(burglary at midnight in the bullion market area of ​​Nashik)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर! दिल्लीतील प्रमुख ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

SCROLL FOR NEXT