Officers and staff of Sinnar Police Station along with the seized items after arresting the burglary gang. esakal
नाशिक

Nashik Crime News : सिन्नरमध्ये घरफोड्या करणारी टोळी जेरबंद : 6 घरफोड्यांची उकल

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : शहरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात सिन्नर पोलिसांना यश आले असून एकूण ६ घरफोडींचे गुन्हे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. (Burglary gang jailed in Sinnar 6 burglary solved 3 arrested nashik Latest Crime News)

तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधिक्षक शहाजी उमप, अपर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सिन्नर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांचा तपास सुरु करण्यात आला होता.

यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तीन ते चार महिन्यांत झालेल्या घरफोड्या या संशयीत आरोपी विनोद राजु पवार (३०, रा. एकता नगर, नायगाव रोड, सिन्नर), पापड्या उर्फ अक्षय भाऊसाहेब जाधव (२६, रा. लोंढे गल्ली, सिन्नर), आदित्य दशरथ माळी (२१, रा. डुबेरे, ता. सिन्नर) यांनी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, पोलिस नाईक समाधान बोऱ्हाडे, एस.पी.शिंदे, कृष्णा कोकाटे, ए. आर. काकड, के. डी. पवार यांच्या पथकाने सापळा रचून या संशयितांना ताब्यात घेतले. पोलिस तपासात त्यांनी शहरातील रेणुकानगर, कानडी मळा, मंगलमुर्ती हाईटस, सरदवाडी रोड, वृंदावन नगर, आटकवडे सुळेवाडी (ता.सिन्नर) या ठिकाणी दिवसा घरफोड्या चोऱ्या केल्याची कबुली दिली.

संशयितांकडून ४ लाख २ हजार ४७६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या गुन्ह्यांचा योग्य तपास केल्याने पोलिस अधिक्षक उमप यांनी तपास पथकास १० हजारांचे रिवॉर्ड देत गौरव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT