robbery esakal
नाशिक

Nashik Crime News : शहरात 2 ठिकाणी घरफोड्या; साडेपाच लाखांचा ऐवज चोरीला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू असून, गंगापूर रोड परिसरातील कुटुंबीय लग्न समारंभासाठी गेले असताना, चोरट्यांनी बंगल्याचा कडीकोयंडा तोडून तब्बल पावणेपाच लाखांचा ऐवज चोरून नेला. तर, दुसरी घरफोडी पाथर्डी फाटा परिसरात घडली. (Burglary in 2 places in city Five half lakh stolen Nashik Latest Crime News)

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

रेखा जयेश राय (रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घरात रविवारी (ता. २७) लग्न समारंभ होता. सोहळा सायंकाळी शहरातील एका लॉन्सवर असल्याने कुटुंबीय पाहुण्यांसह लॉन्सवर गेलेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर गॅलरीचा दरवाजा कशाने तरी उघडला आणि आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून मंगळसूत्र, पेडल, अंगठ्या, टॉप्स, मोरपंखी सोन्याचे झुबे, लहान मुलांच्या चैन, सोन्याचे वेढे, सोन्याच्या लडी असा सुमारे ४ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

याप्रकरणी गंगापूर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहेत. तर दुसऱ्या घटनेत किशोर रवींद्र पवार (रा. पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (ता. २६) मध्यरात्री त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि घरातून २० हजार रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने, असा ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT