Ozar: A car that came to fill fuel at Bharat Petrol Pump, the crowd and the staff extinguished the fire by opening the bonnet esakal
नाशिक

Nashik News : ओझर भारत Petrolवर महागड्या गाडीचा Burning थरार; पोलिस ठाणे अनभिज्ञ

सकाळ वृत्तसेवा

ओझर : मुंबई-आग्रा महामार्गावरील जनार्दन स्वामी आश्रमाच्या समोर असलेल्या भारत पेट्रोलियमच्या पंपावर शुक्रवारी (ता. २५) रात्री एका कारला अचानक लागलेल्या आगीत कारचे मोठे नुकसान झाले असून, या संदर्भात ओझर पोलिस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. एवढी मोठी घटना घडूनही पोलिसांत काहीही माहिती नाही, याबदल मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

शुक्रवारी रात्री सव्वानऊ ते साडेनऊच्या सुमारास पिंपळगाव बसवंत येथून नाशिककडे जात असलेल्या बीएमडब्ल्यू कारने (एमएच ४३, एए ९००७) इंधन भरण्यासाठी सर्व्हिस रोडवरील भारत पेट्रोलियमच्या पंपावर प्रवेश केला असता, कारच्या पुढील बाजूने धूर येत असल्याचे व इंजिनखाली आग लागल्याचे पेट्रोल पंपमालक व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. (Burning thrill of expensive car in Ozar Bharat Petroleum Police station unknown Nashik News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

पेट्रोलपंपावरील कर्मचारी हिरामण वालझाडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता कारचालकास कार पुढे घेऊन जाण्यास सांगून पंपासमोर बाजूला थांबवली. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी एचएएल अग्निशमन दलास पाचारण केले.

एचएएल अग्निशमन दलाचे कर्मचारी व बंब पोचेपर्यंत कारने पेट घेतला व रौद्र रूप धारण केले होते. एचएएलचे फायर इन्स्पेक्टर प्रदीप आहेर, फायरमन ललित केदार, रोहन हिरे, घुमरे, अनिल भालेराव, प्रदीप मोटकरी यांनी पाण्याचा वापर केला. त्यानंतर आग विझविण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी : नाईक

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT