Speed Breaker & Zebra Strips  esakal
नाशिक

Bus Fire Accident : अपघातग्रस्त चौफुलीवर Zebra पट्टे, Speed Breaker

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक- औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुलीवर झालेल्या बस-ट्रकच्या भीषण अपघातात १२ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे शहरातील अपघातांचे ब्लॅकस्पॉट चर्चेत आले. या चौकांमध्ये वाहतूक नियमांच्या कोणत्याही उपाययोजना नसल्याने पोलिस व महापालिका प्रशासनावर टीका झाली. याबाबत ‘सकाळ’ने प्रकाशझोत टाकला होता. या भीषण अपघातानंतर खडबडून जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने अपघातग्रस्त चौकात वाहतूक नियमांच्या उपाययोजना करताना पांढऱ्या रंगाचे झेब्रा पट्टे मारण्यात आले.

तसेच वाहनांच्या वेगाला आळा घालण्यासाठी रम्बलर स्पीडब्रेकरही बसविण्यात आले आहेत. दरम्यान, या दक्षतेने शहरातील सिग्नल्स, चौफुल्यावर वाहतूक नियमांच्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या अपेक्षा जागरूक नाशिककरांकडून व्यक्त केल्या जात आहेत. (Bus Fire Accident Zebra Stripes Speed ​​Breaker on Accident chaufuli near mirchi hotel nashik Latest Marathi News)

अपघातस्थळी स्पीडब्रेकर नसल्याने वाहनांच्या वेगाला आळा न बसल्याने सदर भीषण अपघात झाला. त्यावरून पोलिस व महापालिका प्रशासनातील विसंवाद उघड्यावर आले होते. या अपघाताची दखल गांभीर्याने घेत पोलिसांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे अपघातग्रस्त चौफुलीवर दोन दिवसांपासून वाहतूक नियमांनुसार उपाययोजना सुरू केल्या आहेत.

त्यानुसार, चौफुलीवरील चारही बाजूंनी पांढऱ्या रंगातील झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारले आहेत. तसेच, रॅम्बलर स्पीडब्रेकरही बसविले आहेत. त्यामुळे भरधाव वेगातील वाहनांना यामुळे आळा बसणार आहे. तसेच, या चौफुलीलगतचे अतिक्रमण महापालिका प्रशासनाकडून हटविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, टाकळी रोडकडे जाणाऱ्या रस्त्याचेही दुरुस्तीचे काम करतानाच डांबरीकरण करण्यात येत आहे.

शहरातील चौफुल्यांकडे द्यावे लक्ष

पोलिस वाहतूक शाखेकडून शहरातील सिग्नल, चौफुल्यावर असलेल्या वाहतूक नियमाच्या करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रस्ताव महापालिकेस सादर केले जातात. त्याप्रमाणे, शहरातील बहुतांशी चौफुल्यावर झेब्रा पट्टे नाहीत, चौफुल्यावर रॅम्बलर स्पीडब्रेकर टाकण्याचीही आवश्‍यकता आहे. त्यामुळे सिग्नल क्रॉस करताना भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांना ब्रेक लागू शकेल. त्यामुळे शहरातील चौफुल्यावर वाहतूक नियमाच्या उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT