A private passenger bus overturned in Kharpade Ghat.
A private passenger bus overturned in Kharpade Ghat. esakal
नाशिक

Nashik News : देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची बस उलटली; २६ जखमी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : हरसूल-पेठ रस्त्यावर खरपडे घाटामध्ये शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी खासगी बस उलटली. बसमधील प्रवासी जखमी झाले असून, उपचारासाठी हरसूल आणि त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. रात्री २६ रुग्ण नाशिक जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गुजरात राज्यातील कच्छ भागातील भाविकांना घेऊन काही खासगी बस त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी आले होते. देवदर्शन करून हरसूल-पेठमार्गे गुजरातकडे जात असताना खरपडी घाटामध्ये एका बसने पुढे धावणाऱ्या कारला धडक दिली. (bus of gujarati devotees who came for Devdarshan accident Nashik News)

त्यानंतर संबंधित बस रस्त्यालगतच्या शेतात उलटली, तर कार ही शेतात गेली. बस उलल्याने प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर आले. बसमध्ये ४० प्रवासी असल्याचे समजते. हरसूल व आसपासच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमी प्रवाशांना तातडीने हरसूल आणि त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर रात्री या रुग्णांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण २६ रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झालेली आहे, तर उर्वरित प्रवासी किरकोळ जखमी आहेत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

भाषेचा अडसर

जखमी भाविक हे गुजरातच्या कच या प्रांतातील असल्याने त्यांची भाषा ही वेगळी ओळख आहे, यामुळे रुग्णांशी व त्यांच्या नातलगांशी संवाद साधणे जिल्हा रुग्णालयात कठीण जात होते. भाषा समजत नसल्याने नावे कळण्यासही अडसर येत होता.

जखमींची नावे : करुणा जोशी, मुक्ता कटारिया, विजयाबहेन, लक्ष्मीबहेन, परेशभाई, शांतिलाल कडसन, कोकिळा मकवाना, सौतलाल कसारा, पार्वतीबहेन, भगवतीबाई, छोटूलला पापारिया, जमुनाबाई, पार्वतीबहेन कांतिलाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT