A vehicle market was set up on the premises of the National Highway Authority by breaking the barricades. esakal
नाशिक

Nashik : महामार्ग प्राधिकरणाच्या जागेवर बॅरिकेट्स तोडून व्यवसाय

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : उड्डाणपुलालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जागेवर काही बेशिस्त व्यावसायिकांनी बॅरिकेट्स तोडून आत चक्क वाहन बाजार व गॅरेज व्यवसाय थाटल्याचे चित्र लेखानगर ते भुजबळ फार्म रस्त्यावर दिसून येत आहे. नाशिक- मुंबई महामार्गावर पाथर्डी फाटा येथून भुजबळ फार्मकडे जाताना उड्डाणपुलालगत असणाऱ्या दोन्हीही बाजूस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून झाडेझुडपे लावून काही भागात सुशोभीकरण करण्यात आले होते. (Business by breaking barricades on highway authority premises Nashik Latest Marathi News)

या ठिकाणी अनेक बेशिस्त नागरिक कचरा फेकणे, तसेच वाहने पार्किंग करीत असल्याने तसेच गेल्या काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी संबंधित विभागाकडून लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात आले होते. मात्र, लेखानगर ते भुजबळ फार्म दरम्यान डेक्कन पंपासमोर काही बेशिस्त व्यावसायिकांनी बॅरिकेट्स वेल्डिंग कटरच्या साहाय्याने तोडले आहे.

बॅरिकेट्स तोडून या ठिकाणी वाहन बाजार थाटण्यात आले आहे. ३० ते ४० चारचाकी वाहने नियमित या ठिकाणी लावले जात असल्याने सदर जागेला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काही गॅरेज व्यावसायिक चारचाकी वाहने दुरुस्ती करण्यासाठी या जागेचा वापर करीत आहे. असे असले तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून या अनधिकृत वाहनतळाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे.

महामार्ग विभागाने स्टेट बँक चौक येथील चौपाटीवरील अनधिकृत लागणाऱ्या हॉटेल्स उठवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत संबंधित व्यक्तींना नोटीसही देण्यात आल्या, मात्र या अनधिकृत वाहन बाजाराकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

अधिकारी व संबंधित वाहन बाजार व्यावसायिक यांचे आर्थिक लागेबांधे आहेत की काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. लवकर सदर जागेचे सुशोभीकरण करून अनधिकृतपणे थाटलेले वाहन बाजार व गॅरेज व्यवसाय या ठिकाणाहून हटवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

SCROLL FOR NEXT