नाशिक

कोरोनानंतर पर्यटनाकडे ओढा असल्याने व्यवसायाला संधी

मुंडावरे : जागतिक पर्यटन दिनानिमित्त कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जगभर पर्यटन वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असून, त्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला फायदा होणार आहे. कोरोनानंतर लोकांचा पर्यटनाकडे ओढ आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला उज्वल भविष्य आहे, असे प्रतिपादन पर्यटन संचलनालयाचे उपसंचालक नितीन मुंडावरे यांनी सोमवारी (ता. २७) येथे केले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व हॉटेल संस्कृतीतर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त ‘सर्वसमावेशक विकासासाठी पर्यटन’ या विषयावर हॉटेल संस्कृतीमध्ये झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, कोकण पर्यटनचे दत्ता भालेराव, बेनिवाल ट्रॅव्हलचे दिलीपसिंह बेनिवाल, अभियंता महेश बागूल, प्रा. उमेश पठारे उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, की पर्यटन व्यवसायाशी अनेक घटकांचा संबंध येत असतो. हा प्रत्येक घटक सक्षम होईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पर्यटन वाढीसाठी हॉटेल, ट्रॅव्हल असोसिएशनने पुढाकार घ्यावा. विविध प्रकारच्या उपक्रमांमुळे पर्यटनासंबधी जागृती होत आहे. श्री. भालेराव, श्री. बेनिवाल यांची भाषणे झाली. हॉटेल संस्कृतीचे महाव्यवस्थापक दत्तात्रय शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. जयंत ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. संस्कृती अकादमीचे संचालक संजय कातकडे यांनी आभार मानले. जनशिक्षण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांच्या हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन मांडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT