‘इव्ही’ला तीन महिन्यांची प्रतीक्षा
वाहन खरेदीची आजपासून पर्वणी; दालन सज्ज
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : इंधनाचे वाढते दर यांसह ग्राहकांची बदली आवड लक्षात घेता सध्या इलेक्ट्रिकल व्हिकल (इव्ही) वाहनांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाली आहे. नामांकित कंपनीच्या इव्हीसाठी तब्बल तीन ते चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते आहे. जून-जुलैमध्ये नोंदणी केलेल्या ग्राहकांना, दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीची पर्वणी साधली जाते आहे. रविवारी (ता.८) लक्ष्मीपूजन तर मंगळवारी (ता.१०) पाडव्यानिमित्त होणारी वाहन खरेदी लक्षात घेता, कंपनीचे दालन सज्ज झाले आहेत.
इव्ही वाहनांच्या चार्जिंगच्या अनुषंगाने शहरात पायाभूत सुविधांचा विकास झालेला आहे. बचतीच्या दृष्टीने किफायतशीर वाटत असल्याने, ईव्ही वाहनांच्या खरेदीकडे वाढता ओढा आहे. विशेषतः दुचाकी वाहनांमध्ये एकूण खरेदीच्या सुमारे तीस ते चाळीस टक्के वाटा या वाहनांचा आहे. ग्राहकांकडून मोठी मागणी असली तरी, तुलनेत पुरवठा कमी आहे. यामुळे खरेदीसाठी ग्राहकांना नावनोंदणीनंतर साधारणतः तीन ते चार महिने प्रतीक्षा करावी लागते आहे. ग्राहकांचा कल लक्षात घेता नामांकित कंपनीप्रमाणे स्थानिक स्तरावर उत्पादित ईव्ही असे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहे. चारचाकी वाहनांमध्ये इव्हीच्या जोडीला सीएनजी, हायब्रीड पद्धतीच्या वाहनांकडे खरेदीचा कल वाढला असून, डिझेलच्या वाहन खरेदीमध्ये काही प्रमाणात घसरण झालेली आहे.
----चौकट
सजावटीसाठी गर्दी
चारचाकी वाहनांसाठी शिंगाडा तलाव परिसरात विविध ॲक्सेसरिजची विक्री होते. वाहन खरेदी केल्यानंतर सोयी-सुविधांसाठी या ॲक्सेसरी बसविण्यासाठी लगबग बघायला मिळते आहे. तर दुचाकी वाहनांच्या ॲक्सेसरीज्ची विक्री खडकाळी सिग्नल ते सारडा सर्कल या दरम्यानच्या रस्त्यावरील दुकानांमध्ये होते आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.