नाशिक

लक्ष्‍मीपुजन सोने चांदी खरेदी

CD
लक्ष्मीपूजनानिमित्त सोने खरेदीचा साधला मुहूर्त (उपशीर्षक) सोने-चांदच्या मूर्तीला पसंती; भाव स्थिर असल्‍याने खरेदीसाठी गर्दी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ८ : साडेतीन मुहूर्तांपैकी असलेल्‍या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सुवर्ण आभूषण खरेदी केली जाते, म्हणून रविवारी मुहूर्तावर सकाळपासून सर्व सराफ दुकानात खरेदीसाठी गर्दी होती. सोने- चांदीची मूर्ती आणि शिक्का खरेदी झाली. दीपोत्सवातील महत्त्वाचा लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. लक्ष्मीपूजन व नरक चतुर्दशी असल्‍याने धन आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. याच पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या लक्ष्मी मूर्ती खरेदीला ग्राहकांची पसंती दिसून आली. सराफ बाजारातील दुकानांमध्ये विविध आकारांच्या आणि आकर्षक नक्षीकाम केलेल्या लक्ष्मी मूर्तींची खरेदी झाली. भविष्यातील गुंतवणूक म्हणूनही अनेकांनी खरेदी केली. शिवाय सोन्याचा तुकडा, महालक्ष्मीचे सोन्याचे शिक्के, विविध डिझाईनचे दागिन्‍यांना मागणी होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या सराफ बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोने- चांदीचे भाव स्थिर आठवड्याच्‍या सुरुवातीला सोने- चांदीच्‍या भावात वाढ झाली होती. दोन दिवसांनंतर सोने- चांदीच्‍या भावात मोठी घसरण झाली. शुक्रवारी (ता. ६) मोठी घसरण झाली. शनिवारी (ता. ७) किंचित वाढ झाली. रविवारी भाव स्थिर होते. सोने एक लाख ४२ हजार (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) रुपयांवर आहे, तर चांदीचे भाव एक लाख ८८ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवर कायम आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Decoration Godown Fire : कोल्हापुरात डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग; ऐन दिवाळीत फुलेवाडी रिंग रोड परिसरात खळबळ, अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल

Saudi Arabia Attack : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! राजधानीवर बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; प्रसिद्ध टॉवरचे मोठे नुकसान!

Pune News: शनिवार-रविवार पुण्यातील सिंहगडावर पर्यटकांची मांदियाळी; दोन दिवसांत ४ हजारांहून अधिक जणांची हजेरी

Shambhuraj Desai : "पाच हजार ही केवळ सुरुवात, पूर्ण मदत मिळणार"; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शंभूराज देसाईंचा मोठा दिलासा, सरकार सोबत असल्याचीही दिली ग्वाही

Latest Marathi News Live Update: : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT