Muhurt Trading esakal
नाशिक

Muhurat Trading : गुंतवणूकदारांकडून मुहूर्तावर शेअर खरेदी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिवाळीच्‍या सणानिमित्त मुहूर्त ट्रेडिंगसाठी शेअर बाजार सायंकाळी काही कालावधीसाठी खुला झाला होता. गुंतवणूकदारांनी मुहूर्त साधत विविध कंपन्‍यांच्‍या शेअर्सची खरेदी केली. नाशिककरांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्‍याने विविध ट्रेडिंग कंपन्‍यांच्‍या दालनांमध्ये गुंतवणूकदारांनी ठाण मांडले होते. (Buying shares on muhurat from investors on Diwali festival 2022 Nashik Latest Marathi News)

लक्ष्मीपूजनाच्‍या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगची प्रथा आहे. त्‍यामुळे सार्वजनिक सुट्टीच्‍या दिवशी शेअर बाजार बंद असला, तरी सायंकाळी मर्यादित वेळेसाठी खरेदीसाठी खुला होतो. या दिवशी शेअर खरेदी शुभ असल्‍याची मान्‍यता असल्‍याने अनेक गुंतवणूकदारांनी सोमवारी ही संधी साधली. सायंकाळी मोबाईल ॲपच्‍या सहाय्याने, तसेच आपल्‍या ब्रोकरशी संपर्क करून विविध कंपन्‍यांचे शेअर्स खरेदीकडे कल बघायला मिळाला.

कंपन्‍यांच्‍या दालनांमध्ये गुंतवणूकदारांचा वावर बघायला मिळाला. ज्‍येष्ठांप्रमाणे युवा गुंतवणूकदारांनी खरेदीचा मुहूर्त साधला. ट्रेडिंग सत्रात सुमारे एक ते दीड कोटी रुपयांपर्यंतच्‍या शेअर्सची खरेदी नाशिक परिसरात झाल्‍याचा अंदाज व्‍यावसायिकांनी वर्तविला आहे. त्‍यामुळे सालाबादाप्रमाणे यंदाही मुहूर्त ट्रेडिंगला चांगला प्रतिसाद मिळाल्‍याचे सांगण्यात आले.

सुखामेवा, मिठाईने स्‍वागत

आलेल्‍या गुंतवणूकदारांचे दालनात जल्‍लोषात स्‍वागत करण्यात येत होते. व्‍यावसायिक व गुंतवणूकदार पारंपरिक वेशभूषेत हजर झाले होते. दिवाळी सणाचा गोडवा वाढविण्यासाठी गुंतवणूकदारांना सुखामेवा, मिठाईवाटप करत त्‍यांचे उत्‍स्‍फूर्त स्‍वागत करण्यात येत होते.

"शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगनिमित्त सकारात्‍मकता बघायला मिळाली. अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय स्‍तरावरील तेजीमुळे भारतीय बाजारातही तेजी बघायला मिळत आहे. विशेषतः बँकिंग क्षेत्राशी निगडित शेअरमध्ये उसळी बघायला मिळाली. येत्या दिवसांत प्रतिसाद कायम राहाण्याचा अंदाज आहे." - सुरेश लोया व मोतीलाल ओसवाल, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT