Friends and family celebrating the success of Disha Gujrani, who performed brilliantly at the national level in the CA Foundation Examination. esakal
नाशिक

Success Story: हसत-खेळत, पण शिस्‍तीत केला अभ्यास! दिशाने उलगडले राष्ट्रीय स्‍तरावर ऐतिहासिक कामगिरीचे गमक

सकाळ वृत्तसेवा

Success Story : सकाळी आठपासून आधी बारावीचा अध्ययन आणि त्‍यानंतर दुपारच्‍या सत्रापासून सीए फाउंडेशनची तयारी, अशी दैनंदिनी करताना हसत-खेळत आम्‍ही अभ्यास करायचो. कधीही रट्टा मारला नाही, तर विषयांचा सखोल अभ्यास केला.

त्‍यासाठी शिकवणीत गांभीयाने व शिस्‍तीत लक्ष दिले. यातूनच राष्ट्रीय स्‍तरावर यशस्‍वी कामगिरी करता आली, अशी भावना दिशा गुजरानी हिने ‘सकाळ’शी बोलताना व्‍यक्‍त केली. (CA exam topper Success Disha gujrani unraveled mystery of historic performance at national level nashik)

नुकताच जाहीर झालेल्‍या सीए फाउंडेशनच्‍या निकालात दिशाने राष्ट्रीय क्रमवारीत अव्वल कामगिरी केलेली आहे. तिच्‍या या यशस्‍वी कामगिरीचा आढावा घेताना तयारीचे गमक जाणून घेतले.

दिशा म्‍हणाली, की वडील हॉलसेलचे व्‍यापारी असून, घरात सीए अशी पार्श्वभूमी नाही. वाणिज्‍य शाखेतून अकरावीला प्रवेश घेतल्‍यानंतर सीए करण्याचा निर्धार केला. त्‍याअनुषंगाने गंगापूर रोडवरील माइंड स्‍पार्क ॲकॅडमी येथे शिकवणी लावली.

मयूर संघवी व अन्‍य शिक्षकांच्‍या मार्गदर्शनाखाली परीक्षेच्‍या तयारीला सुरवात केली. अकरावीपर्यंत दोन ते तीन तासिका घेतल्‍यानंतर बारावीपासून मात्र पूर्णवेळ लक्ष केंद्रित केले.

सकाळी पहिल्‍या सत्रात बारावीचा अभ्यास आणि दुपार सत्रात सीए फाउंडेशनचा अभ्यास सुरू ठेवला. घरी गेल्‍यावर होमवर्क करताना मित्र, परिवारासोबत मौजमजा करत हलके-फुलके वातावरण ठेवण्यावर भर दिला. कधीही परीक्षेचे दडपण घेतले नाही, असे दिशा म्‍हणाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सराव परीक्षेतही ३६८ गुण

शिकवणीत अभ्यास करताना एकूण सहा सराव परीक्षांना ती सामोरे गेली होती. यापैकी पहिल्‍या सराव परीक्षेत तिने ३६८ गुण मिळविले होते. तर सीए फाउंडेशन परीक्षेतही तिने ३६८ गुण मिळविल्‍याने, हा योगायोग मित्र परिवारात चर्चेचा विषय ठरला होता.

सोशल मीडियाचा मर्यादित वापर

आपल्‍या दिनचर्येविषयी दिशा म्‍हणाली, की बहुतांश तयारी शिकवणीतच पूर्ण होत होती. पूर्ण लक्ष केंद्रित करून वर्गात अभ्यासाला प्राधान्‍य असायचे. गृहपाठव्‍यतिरिक्‍त घरी फारसा अभ्यास नव्‍हता.

सोशल मीडियाचा वापर अत्‍यंत मोजका व मर्यादित ठेवलेला होता. दिवसाला १५ ते २० मिनिटांपेक्षा जास्‍त सोशल मीडिया वापरायचा नाही, असा निर्धार केलेला होता. त्‍याचाही फायदा होऊन वेळेचा उपयोग करून घेता आल्‍याचे ती म्‍हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT