leopards esakal
नाशिक

बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार; वनविभागावर शेतकरी संतप्त

दीपक खैरनार

अंबासन (जि. नाशिक) : गोराणे (ता. बागलाण) येथे बिबट्याची दहशत सुरूच असल्याने शेतकऱ्यांतून वनविभागाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जात आहे. गावानजीकच्या शिवारातील एका गोठ्यात बिबट्याने प्रवेश करीत गोऱ्ह्यावर हल्ला चढवून ठार केले.

वनविभागाच्या कार्यपद्धतीवर शेतकऱ्यांचा संताप

परिसरात पाळीव जनावरांवर हल्ले होत असताना वनविभागाकडून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.
गावानजीक असलेल्या नथू राजाराम देसले यांच्या शेतातील गट क्र. ९८ मधील बंदिस्त गोठ्यात रविवारी (ता. १०) पहाटेच्या सुमारास बिबट्याने प्रवेश करीत गोठ्यातील दावणीला बांधलेल्या गोऱ्ह्यावर हल्ला चढवून ठार केले. पहाटे शेतकरी देसले यांना निदर्शनास येताच त्यांनी गावात माहिती दिली. गोराणे परिसरात ताहाराबाद व सटाणा वनपरिक्षेत्राची वनजमीन नसल्याने कर्मचाऱ्यांकडून लक्ष घातले जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. या परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. सटाणा वनविभागाकडून एका ठिकाणी पिंजरा लावला असतानादेखील उपयुक्त ठरत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वनविभागाने लक्ष घालून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT