नरकोळ : तिमिरातून तेजाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे म्हटले जाते. प्राचीन काळातील यक्षरात्री, दीपमाला, दीपप्रतिपदुत्सव आणि आताची दिवाळी. दीपावली किंवा दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव.
दिवाळी एक प्राचीन उत्सव आहे. दिवाळी शरद ऋतूमध्ये साजरा केला जातो. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते. शहरी भागात हा उत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. (Calm for Diwali in rural areas due to light rain Farmers panic due to unseasonal rains at narkol nashik)
माञ यंदा अल्प पाऊस झाल्यामुळे बळीराजा निराश असल्याने यंदा दिवाळी सणावर फारसा उत्साह दिसून येत नाही. उन्हाळी कांद्याचे यंदा उत्पन्न भरपूर आले, परंतु अवकाळी पावसाने कांदा उत्पादकाचे नुकसान केले.
यात बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा काढला चाळीत भरला परंतु कालांतराने तो सडू लागला यात व्यापाऱ्यांचा १४ दिवस संपामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
नंतर कांद्याचे भाव काही प्रमाणात वाढले परंतु कांदा शिल्लक नसल्याने आर्थिक चाचणीतून मोकळे होण्यास मार्ग नाही, अशा कठीण परिस्थितीतून शेतकरी आपला उदरनिर्वाह करीत आहे.
यात पाऊसमान कमी पडल्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी पुढे राहील की नाही, याची शास्वस्ती नसल्यामुळे उन्हाळी कांदा सुद्धा यंदा कमी प्रमाणात लागवड होणार आहे. त्यामुळे दिवाळी सणावर यंदा नूर उत्सव दिसून येत आहे
"शेतकऱ्यांच्या दृष्टीने सण उत्साहात साजरा करण्याचा योगच नसतो. अस्मानी सुलतानी संकट हे त्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. निसर्ग साथ देतो पण भाव राहत नाही, भाव राहतो तर निसर्ग साथ देत नाही, यामुळे दिवाळी मोठा उत्सव आहे." - विश्वास आहिरे, केरसाणे, ता.बागलाण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.