fund sakal
नाशिक

Nashik News : दलितवस्ती सुधारणा अंतर्गत कामांच्या प्रशासकीय मान्यता रद्द?

जिल्ह्यातील दलितवस्ती सुधार योजनेतील कामांसाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी समाजकल्याण विभागाने ५४ कोटींचा आराखड्यातील कामांना प्रशासकीय मान्यता देणे व निधी वितरण करताना केलेल्या मनमानीमुळे जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी नाराज आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यातील दलितवस्ती सुधार योजनेतील कामांसाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी समाजकल्याण विभागाने ५४ कोटींचा आराखड्यातील कामांना प्रशासकीय मान्यता देणे व निधी वितरण करताना केलेल्या मनमानीमुळे जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी नाराज आहेत. (Cancellation of administrative approval of works under Dalit settlement reform nashik news)

त्यात जिल्ह्यातील ज्येष्ठमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या कामांच्या यादीतील केवळ दहा टक्के कामांना निधी दिला असून तोही अगदी तोकडा दिल्याने त्यांनी येवला तालुक्यातील कामांच्या प्रशासकीय मान्यता व तरतूद केलेला निधी रद्द करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्याचे समजते. जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा नियोजन समितीला अनुसूचित जाती घटक योजनेसाठी निधी देण्यात येतो.

जिल्हा परिषदेने यावर्षी या योजनेतून दलित वस्ती सुधार योजनेचा ५४ कोटींचा आराखडा तयार केला असून त्यातून ६५० कामे प्रस्तावित केली आहेत. मात्र, यंदा जिल्हा नियोजन समितीला अनुसूचित जाती घटक योजनेतून प्राप्त झालेल्या १०० कोटी रुपये निधीतून ग्रामीण भागासाठी केवळ २७ कोटी रुपये नियतव्यय दिला असून उर्वरित निधी नगरपालिकांना दिला.

यामुळे निधीच्या केवळ ५० टक्के नियतव्यातून प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या. आराखड्यातील सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देताना समाजकल्याण विभागाने प्रत्यक्ष निधीची तरतूद करताना कोणताही निकष ठरवले नाहीत.

ज्येष्ठमंत्री भुजबळ यांच्या कार्यालयाने येवला तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेतून विविध गावांसाठी १२० कामांच्या यादीतून विभागाने केवळ दहा टक्के कामांना किरकोळ स्वरूपात निधी दिला असून इतर कामांना निधी दिला गेला नाही. याउलट येवला तालुक्यातीलच मंत्री भुजबळ यांनी शिफारस न केलेल्या अनेक कामांना भरघोस निधीची तरतूद केली आहे.

शिफारशी डावलून नियोजन करीत असल्याचा संदेश गेला असल्याचे भुजबळ संतप्त झाले आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रजेवरून आल्यानंतर येवला तालुक्यातील दलित वस्तीच्या सर्व कामांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करून निधी वितरणही रद्द करण्याबाबत सूचना केल्या असल्याचे समजते.

अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल..

मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सध्या रजेवर असून ते पुन्हा रुजू झाल्यानंतर येवल्यातील दलितवस्ती योजनेतील कामांच्या प्रशासकीय मान्यता व निधीची तरतूद रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवली न गेल्यास त्यांना मंत्री भुजबळ यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! TCS-Infosys शेअर्सची स्थिती काय? टॉप गेनर्स कोण?

SCROLL FOR NEXT