MPSC Exam esakal
नाशिक

MPSC बदललेल्या परीक्षा पद्धतीच्या निर्णयावर आयोग ठाम; उमेदवारांत नाराजी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) परीक्षा पद्धतीत विविध बदल यापूर्वी जाहीर करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) परीक्षा पद्धतीत विविध बदल यापूर्वी जाहीर करण्यात आले आहेत. दरम्‍यान नुकतीच परीक्षा योजना व अभ्यासक्रमाबाबत सूचनापत्र जारी करताना बदल जाहीर केले आहेत. या बदलांना उमेदवारांकडून विरोध केला जातो आहे. या मुद्यावर आयोग व उमेदवार आमनेसामने असल्‍याची स्‍थिती सध्या निर्माण झालेली आहे. आंदोलनाच्‍या पावित्र्यात उमेदवार असताना आयोगाने मात्र कारवाईचा इशारा दिल्‍याने हा मुद्दा चिघळण्याची शक्‍यता आहे.

अतिरिक्त दीड हजार गुणांचा अभ्यासक्रम तसेच तयारीकरीता मिळणारा मर्यादित कालावधी यामुळे अभ्यासक्रम अन्‍यायकारक असल्‍याचा दावा उमेदवारांकडून केला जातो आहे. मंगेश सानप (नाव बदललेले) या उमेदवारांच्‍या म्‍हणण्यानुसार जुन्‍या व नवीन अभ्यासक्रमात ऐंशी ते नव्वद टक्‍यांपर्यंत फरक आहे. अशात यापूर्वीच्‍या शिक्षणक्रमानुसार अभ्यास सुरु असतांना आता पुन्‍हा नव्‍याने अभ्यास करतांना उमेदवारांची नाहक दमछाक होणार आहे. यासंदर्भात शासनाने नेमकी भूमिका घेत विद्यार्थी हिताचे निर्णय घ्यावे, असे उमेदवारांचे म्‍हणणे आहे.

आयोगाच्‍या निर्णयाविरोधात परीक्षार्थींकडून आंदोलनाची तयारी सुरु आहे. असे असतांना दुसरीकडे मात्र आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाईचा इशारा करणारे ट्विट आज आयोगाने केले, त्यामुळे विद्यार्थी अधिकच संतापले आहेत. त्यामुळे हा मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे.

उमेदवारांनी मांडलेल्‍या अडचणी

नवीन अभ्यासक्रमांच्‍या पुस्‍तक, संदर्भ साहित्‍य उपलब्‍धतेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. दीड हजार गुणांच्‍या अभ्यासासाठी मुबलक कालावधी मिळणे आवश्‍यक आहे. लिखाणाची फारसी सवय नसल्‍याने परीक्षा कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या निर्णयाचा अधिक प्रामणात फायदा होईल. नऊशे गुणांची परीक्षा थेट दोन हजार ०२५ गुणांची झाल्‍याने याबाबतही आक्षेप नोंदविलेला आहे.

'एमपीएससी' कारवाईच्‍या पावित्र्यात

सुधारित परीक्षा योजनेच्या अनुषंगाने तयारीसाठी उमेदवारांना सुमारे दीड वर्षाचा कालावधी उपलब्ध होईल, असे नियोजन केले आहे. हा बदल राज्य सेवा परीक्षा २०२३ पासून लागू केला असून त्याचा सध्या प्रक्रिया सुरू असलेल्या भरती प्रक्रियेशी काहीही संबंध नसल्‍याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे स्‍पष्टीकरण दिले आहे. सुधारित परीक्षा योजनेसंदर्भात २४ जूनला उमेदवारांना अवगत करतांना हा निर्णय २०२३ च्या परीक्षेपासून लागू करण्यात येईल असेही स्पष्ट केले होते. सुधारित अभ्यासक्रमासंदर्भात काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून आंदोलन केले जात असल्‍याचे निदर्शनास आले आहे. अशा घटनांची गंभीर दखल घेतली असल्‍याचा इशारा देतांना, आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजून उचित कारवाई केली जाणार असल्‍याचे आयोगाने कळविले आहे.

''आधीच कोरोना महामारीमुळे स्‍पर्धा परीक्षांचे वेळापत्रक कोलमडलेले आहे. २०२० च्‍या नियोजित परीक्षांची प्रक्रिया अद्यापपर्यंत पूर्ण होऊ शकलेली नाही. त्‍यात नवीन अभ्यासक्रमामुळे आणखी गोंधळ निर्माण होईल.'' - उमेश, परीक्षार्थी ( नाव बदललेले आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT