Admission
Admission Sakal
नाशिक

Admission: जूनच्‍या पहिल्‍या आठवड्यात कॅप राउंड! अभियांत्रिकीच्‍या 16 अन फार्मसीच्या 15 हजार जागांवर प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

Admission : बारावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे वेध लागलेले आहेत. साधारणतः जूनच्‍या पहिल्‍या आठवड्यापासून कॅप राउंडच्‍या प्रक्रियेला सुरवात होणार आहे.

याअंतर्गत नाशिक जिल्ह्यासह नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार असे पाच जिल्‍हे मिळून अभियांत्रिकी पदवी (बी.ई.) करिता सुमारे १५ हजार ९६४ जागा, तर औषधनिर्माणशास्‍त्र शाखेत डी. फार्मसी. सात हजार ३२० आणि बी. फार्मसी. सात हजार ८३०, अशा सुमारे पंधरा हजार जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. (Cap round in first week of June Admission to 15 thousand seats of 16 Engineering and Pharmacy nashik news)

बारावीच्या गुणपत्रिका ५ जूनला वितरित केल्या जाणार आहेत. करिअरच्‍या बाबतीत सजग व जागरूक असलेल्‍या विद्यार्थ्यांना आता उच्च शिक्षणाचे वेध लागलेले आहे. टप्प्याटप्प्‍याने विविध सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर झालेले आहेत.

आता कॅप राउंडच्‍या प्रक्रियेची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह पालकांना लागून आहे. जून महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यात कॅप राउंडअंतर्गत नोंदणी प्रक्रियेला सुरवात होईल. तर साधारणतः जूनच्‍या दुसऱ्या आठवड्यानंतर प्रवेश निश्‍चितीच्‍या प्रत्‍यक्ष प्रक्रियेला सुरवात होणार असल्‍याचे सांगितले जात आहे

सीईटीचा निकाल १२ ला अपेक्षित

अभियांत्रिकी (बीई), औषधनिर्माणशास्‍त्र (बी. फार्मसी.) यांसह बी.एस्सी. (कृषी) या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेच्‍या उत्तरतालिका किंवा अन्‍य बाबींसंदर्भात हरकती नोंदविण्यासाठी रविवार (ता. २८)पर्यंत मुदत दिलेली होती.

या परीक्षेचा निकाल येत्‍या १२ जूनला जाहीर होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. निकालाची अधिकृत तारीख सीईटीसेलकडून जारी केली जाणार आहे. तत्‍पूर्वी कॅप राउंडकरिता नोंदणी प्रक्रियेला सुरवात होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नाशिक विभागात उपलब्‍ध जागांची स्‍थिती अशी :

(शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्‍या आकडेवारीनुसार)

अभ्यासक्रम नाशिक नगर जळगाव धुळे नंदुरबार

कॉलेज क्षमता कॉलेज क्षमता कॉलेज क्षमता कॉलेज क्षमता कॉलेज क्षमता

अभियांत्रिकी २० ७,५५८ १० ३,५४० ९ २,६७० ५ १,७४० २ ४५६

बी. फार्मसी. ३२ २,५५० ३० २,३६० १५ १,१८० १३ १,१८० ६ ५६०

डी. फार्मसी. ३९ २,३४० ३९ २,३४० २० १,२०० १६ ९६० ८ ४८०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT