SYSTEM
नाशिक

नाशिक : मुंबई नाका परिसरात धावत्या कारने घेतला पेट

मुंबई नाका परिसरात भररस्त्यात धावत्या कारने अचानक पेट घेतला.

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : मुंबई नाका परिसरात भररस्त्यात धावत्या कारने अचानक पेट घेतला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला, कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. मुंबई नाक्याकडून भाभानगरच्या दिशेने जाणाऱ्या कारने (एमएच- १५- सिटी ८१९८) गुरुवारी (ता. २८) सकाळी अचानक पेट घेतला. चालकासह कारमध्ये चार जण होते. कारच्या पुढील भागातून धूर येत असल्याचे चालक गौस खान यांच्या लक्षात आले. त्यांनी सर्वांना खाली उतरण्यास सांगून चालकासह सर्व बाहेर आले. (Car caught fire in Mumbai Naka area Nashik)

बघताच कारने मोठा पेट घेतला. मुंबई नाका पोलिस ठाण्यासमोर प्रकार घडल्याने त्यांनी अग्निशामक विभागास घटनेची माहिती दिली. अवघ्या काही मिनिटात शिंगाडा तलाव मुख्यालयातील अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. लिडींग फायरमन इक्बाल शेख, फायरमन राजेंद्र नाकील, इसाक शेख, हेमंत बेळगावकर, नाना गांगुर्डे, नाजिम शेख यांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे प्रमाण जास्त असल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. भररस्त्यात कार जळत असल्याने वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. मुंबई नाका पोलिस ठाण्यात अकस्मात जळीत नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या विविध भागात अशाप्रकारे धावत्या वाहनांना आग लागण्याच्या अनेक घटना समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT