Suspect captured on CCTV footage esakal
नाशिक

Nashik Crime : तिग्रानिया रोड परिसरातून कार चोरी

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : तिग्रानिया रोडवरून कार (एमएच- १५- जीएल- ९१४१) चोरी झाल्याचा प्रकार बुधवार (ता. २७) मध्यरात्री घडला. कारमालक अरुण डोंगरे यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (Car theft from Tigrania Road area nashik latest crime news)

श्री. डोंगरे यांनी नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी त्यांची कार राहत असलेल्या बिल्डिंगच्या समोर पार्क केली. गुरुवारी (ता.२८) सकाळी सहाच्या सुमारास त्यांना कार पार्किंगच्या ठिकाणी आढळून आली नाही. परिसरात शोध घेतला तपास लागला नाही.

त्या ठिकाणी असलेल्या भंगार व्यवसायाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्यात कारमधून आलेले तीन संशयित श्री. डोंगरे यांच्या कार शेजारी उभे राहून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळले. त्यानंतर रात्री पावणेदोनच्या सुमारास त्यांची कार चोरी करून तपोवनच्या दिशेने गेल्याची माहिती त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केली.

भद्रकाली पोलिसांकडून तपास सुरू आहे. दीड ते दोन महिन्यापूर्वी येथीलच काठे गल्ली परिसरातून मारुती एस्टिम चारचाकी चोरी झाल्याचा गुन्हा दाखल आहे. काही दिवसांपासून भद्रकाली पोलिस स्टेशन हद्दीत दुचाकी आणि कार चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहे. अशा घटनांना पोलिसांनी आळा घालण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

Pune News : मध्य रेल्वेत चोरीचा सुळसुळाट; १६ दिवसांत मोबाईल व मंगळसूत्र चोरी

Latest Marathi News Live Update : घनसावंगी तालुक्यात ढगाळ वातावरण

'ढोंगी साध्वी' ना भगवे कपडे ना गळ्यात कोणत्या माळा, संन्सास घेणारी ममता कुलकर्णी दिसली ग्लॅमरस लूकमध्ये Viral Video

IPL 2026: 'विराट-रोहितला जसा पर्याय नाही, तसाच संजू सॅमसनलाही...'; राजस्थान रॉयल्सच्या ट्रेडवर काय म्हणाला नवा कर्णधार?

SCROLL FOR NEXT