suicide case news esakal
नाशिक

घंटागाडी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नरेश हाळणोर

नाशिक : तिघा निरीक्षकांच्या त्रासाला कंटाळून घंटागाडी कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्येप्रकरणी (Suicide) तिघा संशयितांविरोधात उपनगर पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (Crime) अखेर दोन दिवसांनी दाखल झाला. (Case filed against 3 suspects in Ghantagadi employees suicide case Nashik News)

किरण माणिक पुराणे (वय २६, रा. आगरटाकळी, जेल रोड) या घंटागाडी कर्मचाऱ्याने सोमवारी (ता. २०) राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी जतीन दाणी (४५, रा. पंचवटी), रमीज मणियार (३८, रा. जुने नाशिक), सुमीत कोष्टी (३२, रा. सिडको) या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अरुण पुराणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, किरणला तिघा संशयित त्रास देत सतत पैशांची मागणी करीत होते. पैसे न दिल्यास कामावर न घेण्याची धमकी देत, तसेच पगार झाल्यावर पार्टी मागत होते. या सततच्या त्रासाला कंटाळून किरणने सोशल मीडियावर तिघा संशयितांची नावे घेत आत्महत्या करीत असल्याचा संदेश व्हायरल केला होता. या प्रकरणी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला.

घंटागाडी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

घंटागाडी कर्मचाऱ्यांमध्ये छळवणुकीबाबत नेहमीच असंतोष राहिला आहे. किरणच्या आत्महत्येनंतर कर्मचारी संतप्त झाले होते. नातगलांनी कारवाईची मागणी केली होती. कर्मचाऱ्यांना निरीक्षक, ठेकेदाराकडून सतत त्रास दिला जात असल्याच्या नेहमी तक्रारी होत आहेत, मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करत, ‘ECI’ने मतदारांनाही केल्या १० महत्त्वाच्या सूचना!

IND vs PAK : भारताच्या 'पोरींना' दिला त्रास, ICC ने उतरवला माज! पाकिस्तानच्या खेळाडूवर कारवाई

Maharashtra Politics: गणेश नाईकांचं 'ते' विधान अन् 14 गावांचा एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय

Uttar Pradesh :  कर विभागात फील्डवर ‘अशा’ अधिकाऱ्यांचीच करा भरती; CM योगी आदित्यनाथ यांनी दिले कडक आदेश

Uttrakhand : उत्तराखंडची ही ठिकाणं पहाल तर स्वित्झर्लंड विसरून जाल; हे पाच सुंदर लोकेशन्स एकदा पहायलाच हवेत

SCROLL FOR NEXT