crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : मजुराच्या मृत्युप्रकरणी बिल्डरविरोधात गुन्हा दाखल!

नरेश हाळणोर

नाशिक : बहुमजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झुल्यावर बसून प्लंबिंगचे काम करणार्या मजुराचा पडून दुर्दैवी मृत्यु झाल्याप्रकरणी बिल्डर धनंजय तुकाराम फालक (४५, रा. धनश्री अपार्टमेंट, सावरकर नगर) यांच्याविरोधात मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case filed against builder in death of laborer Nashik Crime News)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

सचिन रामदास देवरे (३४, रा. शिवाजीनगर) असे मयत प्लंबरचे नाव आहे. संदीप रामदास देवरे यांच्या फिर्यादीनुसार, बिल्डर फालक यांच्या पार्थ रेसीडेन्सी या इमारतीचे काम ध्रुवनगरमध्ये सुरू आहे. याठिकाणी मयत सचिन हे गेल्या शनिवारी (ता. १७) पाचव्या मजल्यावर झुल्यावर बसून प्लंबिंगचे काम करीत होते.

त्यावेळी झुल्याची गाठ सुटून झालेल्या दूर्घटनेत ते मयत झाले होते. धोकादायकरित्या काम सुरू असताना बिल्डरने संरक्षणात्मक उपाययोजन न केल्याने प्लंबर सचिन यांचा जीव गेला. याप्रकरणी बिल्हर फालक यांच्याविरोधात गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक शेंडेकर हे पुढील तपास करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT