raj thackeray
raj thackeray 
नाशिक

राज ठाकरेंचा नाशिक दौरा : मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीचे (muncipal corporation election) रणशिंग फुंकले असतानाच पक्षाच्या बळकटीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) नाशिक दौऱ्यावर असतानाच मनसे कार्यकर्त्यावर (mns activists) गुन्हा दाखल झाल्याची बातमी समोर येतेय.

नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यक्रमाला गर्दी जमवणं कार्यकर्त्यांना चांगलचं भोवलं आहे. यानंतर नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचे नियम धाब्यावर बसवित मनसेच्या जनहित कक्ष आणि विधी विभाग कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली.

अंबानींच्या घराखाली गाडी का ठेवली, अजून तरी कळलं का?

नाशिक दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (ता. १३) पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, की लोक त्यांच्या प्रश्‍नांबाबत गंभीर नाहीत. त्यामुळे अनेक प्रश्‍न नुसते उपस्थित होतात अन्‌ नंतर बाजूला पडतात. अंबानींच्या घराखाली गाडी का ठेवली, अजून तरी कळलं का? गाडी ठेवणाऱ्याचा हेतू कळला नाही, मात्र देशमुख आत आहे. देशात आर्यन आणि सुशांतवर चर्चेत वेळ वाया घातला जातोय. सामान्य मतदार पाच वर्षे विविध प्रश्‍नांना तोंड देतात. पण, निवडणुकीत मात्र भलत्याच मुद्द्यावर चर्चा भरकटविल्या जातात. विशेष म्हणजे मतदारही त्याला बळी पडतात.

अचानक ओबीसी आरक्षणाचा विषय कसा आला?

अचानक ओबीसी आरक्षणाचा विषय कसा आला, जितक सोपं वाटत तितकं सोपं नाहीये हे. कोण कोर्टात गेलं? का गेलं? हे समजून घ्यायला हवं. जातीपतीतून बाहेर येत नाही तोपर्यंत हे असंच सुरू राहणार. राज्यातील मुख्य प्रश्‍नांवरून लोकांचे लक्ष विचलित करून काहींना हा महाराष्ट्र मुद्दामच जातीपातीत ठेवायचा आहे. त्यातच काहींचे हित आहे, पण हे मतदारांच्या लक्षात येत नाही. ही मूळ अडचण आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी येथे केले.

खासगी व्यवस्‍थापन असावे

ठाकरे म्हणाले, की राज्यात एसटी कामगार त्यांच्या युनियन विसरून एकत्र आले आहेत. त्यांच्या अडचणी गंभीर आहेत. त्यामुळे दखल घेतली पाहिजे. महामंडळात भ्रष्टाचार मोठा आहे. त्याकडे राजकारणी मंडळींचे दुर्लक्ष आहे. भ्रष्टाचार न थांबविता अपुऱ्या वेतनावरील कर्मचाऱ्यांना उपदेशाचे डोस पाजणे चुकीचे आहे. महामंडळाचे खासगीकरण करण्यापेक्षा एसटी महामंडळाला पुनरुज्जीवित करण्यासाठी एखाद्या व्यावसायिक संस्थेकडे मंडळाचे कामकाज सोपविता येईल, असेही त्यांनी सुचविले.

स्‍ट्रॅटेजी कुणी जाहीर करतं का?

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मनसे-भाजप युतीविषयी ते म्हणाले, की प्रसारमाध्यमेच युतीच्या चर्चा घडवून आणतात, पण तुमचा सोर्स समजत नाही. अशा युतीच्या चर्चा सुरू असतील; पण त्या मलाच माहीत नाही. निवडणुकांची तयारी, दौऱ्याविषयी पत्रकार परिषदा घेऊन राजकीय पक्ष स्ट्रॅटेजी सांगत असतो का, असा प्रश्‍न करीत त्यांनी, मनसेने केलेले नाशिकमधील काम नाशिककरांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन केले.

कोरोना नियमांबाबत गोंधळ

कोरोनासंदर्भात सरकार काय नियम करते हे प्रशासकीय यंत्रणेलाच कळत नाही. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचे नियम पाहायला मिळतात. कोरोना काळात ठराविक मंडळींना सूट मिळत असल्याने त्यातून अनेकांमध्ये अस्वस्थता आहे. सिनेमागृहात एसी नको; पण रेस्टॉरंटमध्ये चालतो, हे कसले नियम? नियमांबाबत सरकारमधील लोकांनाच समजत नाही. आचारसंहिता काळात कॅमेरा कुठे घेऊन जायचा, याचे भान यांना नाही. बाथरूमपर्यंत कॅमेरा घेऊन फिरायचे. जे नियम सरकारच्या लोकांनाच माहीत नाही ते सामान्य लोकांना काय समजणार? गाइडलाइन व्यवस्थित असायला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT