msedcl  esakal
नाशिक

Nashik Crime News : कॉलेजरोड परिसरात वीजचोरीचा पर्दाफाश गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महावितरण (MSEDCL) वीज कंपनी तोट्यात असण्यामागे वीजचोरी कळीचा विषय आहे. (case has been registered in Gangapur police after electricity theft was uncovered in College Road area nashik news)

शहरातील झोपडपट्टी परिसरात वीजचोरीचे प्रकार सर्रासपणे होत असल्याचे बोलले जात असताना, कॉलेजरोडसारख्या शहरातील उच्चभ्रु वसाहतीतील अपार्टमेंटमध्ये वीजचोरी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

प्रवीण मधुकर खर्डे (रा. साई अनुसया अपार्टमेंट, मान्यवर चौक, कॉलेजरोड) यांच्याविरोधात १ लाख ११ हजार रुपयांच्या वीजचोरीप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुजित विजय नासिककर (रा. खुडवटनगर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित खर्डे हे साई अनुसया अपार्टमेंट या इमारतीच्या फ्लॅट क्रमांक आठमधील रहिवाशी आहेत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

संशयित खर्डे यांनी विद्युत मंडळाची कोणतीही परवानगी न घेता फेज ते न्युट्रल यामध्ये काळ्या रंगाची वायर टाकून मीटरचा वेग कमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महावितरणाच्या वीज मीटरमध्ये अनाधिकृतरित्या फेरबदल करुन वीजचोरी केली.

यामुळे वीज कंपनीचे मीटर ५१ टक्के कमी गतीने फिरले. यामुळे संशयित खर्डे यांच्या वीज मीटर रिडिंग कमी होऊन वीजचोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार, याप्रकरणी संशयित खर्डेविरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT