Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News: बनावट ॲपल ॲक्सेसरीजप्रकरणी ‘कॉपीराईट’ कायद्यान्वये गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरातील महात्मा गांधी रोडवरील (एमजी रोड) मोबाईल ॲक्सेसरीज मार्केटमधील पाच दुकानांवर पोलिसांनी छापामारी करीत ॲपल कंपनीचे पावणे पाच लाखांच्या बनावट ॲक्सेसरीज जप्त केला.

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात चौघांविरोधात कॉपीराईट ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered under Copyright Act in case of fake Apple accessories Nashik Crime News)

विपिन चिमणाजी पटेल (४३, रा. उदय कॉलनी, पंचवटी), बाबुलम नेथिराम चौधरी (२७, रा. उदय कॉलनी, पंचवटी), सुरेश भोपाजी देवास (२२, रा. दीपज्योती अपार्टमेंट, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी), रमेश मगा प्रजापती (३२, रा. मधुबन कॉलनी, मखमलाबाद नाका) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

ॲपल कंपनीचे प्रतिनिधी कुंदन गुलाबराव बेलोशे (रा. विठ्ठलवाडी, पूर्व कल्याण, ठाणे) यांच्या फिर्यादीनुसार, एमजी रोड परिसरातील मोबाईल मार्केटमध्ये ॲपल कंपनीचे बनावट ॲक्सेसरीज विक्री केली जात होती.

त्यामुळे कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होत होता. याबाबत खातरजमा केल्यानंतर शहर गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकाने बुधवारी (ता. १९) दुपारी दोन वाजता पाच दुकानांवर छापा टाकला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यात ॲपल इंक कंपनीच्या बनावट ॲडाप्टर, युएसबी केबल, एअरपॉड, मोबाईल बॅककव्हर, ॲपल स्टीकर यासह साहित्य असे ४ लाख ६३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात कंपनीच्या स्वामीत्व हक्काचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरवाडे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT