Minor Girl esakal
नाशिक

Nashik Crime: अल्पवयीन संशयिताविरोधात पोक्सोअन्वये गुन्हा दाखल; गर्भपाताच्या असह्य त्रासाने घटना उघडकीस

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : अंबड परिसरात नात्यातीलच अल्पवयीन संशयिताने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध केले. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर संशयिताने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या.

यामुळे झालेल्या असह्य त्रासामुळे सदरील घटनेची वाच्यता झाली. याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी पोलीसात संशयिताविरोधात तक्रार दिली.

त्यानुसार अल्पवयीन संशयिताविरोधात अंबड पोलिसात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे अल्पवयीन मुलांमध्ये वाढत असलेल्या वासनांधतेची समस्या समाजासाठी चिंताजनक आहे. (Case registered under POCSO against minor suspect incident unfolded with unbearable pain of abortion Nashik Crime)

१७ वर्षीय अल्पवयीन संशयित मुलगा हा ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरामधील विठ्ठलवाडी येथील श्रीराम नगर परिसरात राहणार आहे. तर, सिडकोतील भाद्रपद सेक्टरमध्ये राहणाऱ्या नातलगांकडे त्याचे नेहमी येणे-जाणे होते.

याच दरम्यान त्याचे साडे सोळा वर्षांच्या पीडितेशी प्रेमसंबंध जुळले. त्यातून त्यांच्यात जानेवारी २०२२ ते २३ जून २०२३ यादरम्यान पीडित मुलीच्या घरातच शारीरिक संबंध आले. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सदरची बाब तिने संशयिताला सांगितली. त्याने तिला १६ जून रोजी गर्भनिरोधक गोळ्या देत तिचा गर्भपात केला. मात्र कोणत्याही वैदयकीय सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या पीडितेने घेतल्याने तिला असह्य असा त्रास होऊ लागला.

त्यामुळे या घटनेची वाच्यता झाली. त्याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी नात्यातील संशयित अल्पवयीन मुलीविरोधात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक नाहीद शेख करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Violence: कट्टर भक्तांचा कहर... RJD ची स्तुती केली म्हणून NDA समर्थक मामांनी भाचाला संपवलं, कुठं घडली घटना?

Sheikh Hasina : शेख हसीना यांची फाशी रद्द होणार की नाही? आता निर्णय भारताच्या हातात, जाणून घ्या काय आहे नियम

Kelva Beach: वीकेंडला निसर्गाचा आनंद घ्यायचा? मग डहाणू ट्रेनने निघा आणि थेट ‘केळवा बीच’वर पोहोचा

Maharashtra Politics:'सुशीलकुमार शिंदेंच्या गुगलींवर शरद पवारांचा गुड लेफ्ट'; बॅटिंग टाळली, जुन्या आठवणींना उजाळा..

माेठी बातमी! 'बिबट्याच्या हल्ल्यातील नुकसान भरपाई वाढणार'; शासनस्तरावर हालचाली सुरु, राज्यभरात हल्ल्यांत वाढ..

SCROLL FOR NEXT