arrested esakal
नाशिक

फळझाडांची अवैध कत्तल पकडली; मुद्देमालासह 3 जण ताब्यात

पोपट गवांदे

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज रात्रीच्या वेळी जंगलातून शेकडो झाडांची अवैध कत्तल करून वाहतूक सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्याने शुक्रवारी (ता. ८) रात्री नऊच्या नऊच्या सुमारास वनक्षेत्रपाल अधिकारीसह पथकाने कारवाई करीत लाकडाचा कापलेला साठा आणि वाहनांसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाने सापळा रचत इगतपुरी वनपरिक्षेत्र हद्दीत असलेल्या वासाळी फाटा येथे ट्रक (एम.एच.१२ एचडी.७८५६ ) हा सिन्नरच्या दिशेने जात असतांना अडविला. त्या अवैधरित्या तोडलेले लाकूड आढळून आले. ट्रकचालकाकडे वनविभाग पथकाने परवान्याची मागणी केली, मात्र चालकाकडे परवाना नसल्याने वनविभागाचा संशय खरा ठरला. वनविभाग पथकाने ट्रकची तपासणी केली असता त्यात आंबा, जांभूळ, सादडा या झाडांचे लाकूड अवैधरित्या तोडलेले आढळून आले.


या ट्रकमध्ये अंदाजे २६ टन तोडलेले लाकूड असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. यात दोघांसह ट्रकच्या चालक आणि वाहन ताब्यात घेऊन कारवाईसाठी हे वाहन वनविभागाच्या कार्यालय आवारात आणण्यात आले. हा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली. या घटनेतील संशयित नितीन एकनाथ खांडके (रा. अकोले), जयेश डगळे, रविक महादू वळवी (रा. सुतारपाडा, गुजरात) या तिघांकडून घटनेबाबत कबुलीजबाब घेण्यात आला. याप्रकरणी कारवाई करणार असल्याची माहिती वन परिमंडळ अधिकारी दत्तात्रय ढोन्नर यांनी दिली.

वनपरिक्षेत्र प्रादेशिक अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी दत्तात्रय ढोन्नर, भाऊसाहेब राव, वनरक्षक स्वाती लोखंडे, गोरख बागूल, वनविभाग वाहनचालक मुज्जफर शेख, वनमजुर निरगुडे, कोरडे, धोंगडे यांच्यासह वनकर्मचारीचे पथक कारवाईत सहभागी झाले होते. या कारवाईने इगतपुरी तालुक्यात बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT