CCTV installed at prime location in Gram Panchayat premises at Vadel.
CCTV installed at prime location in Gram Panchayat premises at Vadel. esakal
नाशिक

Nashik News : वडेल चौपाटीवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर; ग्रामपंचायत प्रशासनाचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

वैभव सोनवणे : सकाळ वृत्तसेवा

वडेल : गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारीच्या घटनांवर वचक ठेवण्यासाठी येथील ग्रामपंचायतीने आवारात सीसीटीव्ही बसविले आहेत. विकासाचा आदर्श समोर असला तर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘नवदृष्टी’ साकार करता येते.

गावामध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे संपूर्ण चित्रीकरण ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या स्क्रीनवरती दिसणार आहे. गावातील प्रत्येक हालचालींवर आता ग्रामपंचायतीचे नियंत्रण असणार आहे. (cctv at Vadel Chowpatty Initiative of Gram Panchayat Administration Nashik News)

वडेल गावातले सीसीटीव्ही आज गावची दृष्टी बनले आहे. गावात प्रवेश करणारे, ये-जा करणारी वाहने, फेरीवाले, भंगारवाले, भाजीवाले, सेल्समन ,गुन्हेगारी आदी व्यक्तींच्या हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालयातून करडी नजर असणार आहे.

चोरी, टवाळखोरी, बेकायदेशीर गोष्टी, चांगलाच आळा बसणार आहे. जणू गावालाच तिसरा डोळा आला आहे. यापुढे कोणतेही गैरकृत्य लपणार नाही व चांगले काम दिसल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात सरपंच नरेंद्र सोनवणे, ग्रामसेवक के. एस. पवार यांनी आनंद व्यक्त केला.

बाजारपेठेचे गाव असलेल्या वडेल परिसरातून अनेक वाहनांची वर्दळ असते. दरम्यान काही गुन्हा घडल्यास त्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांना मोठे परिश्रम घ्यावे लागतात. ही बाब सरपंचांच्या लक्षात वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस यांनी आणून दिली.

त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार सोनवणे यांनी पुढाकार घेत सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन वडेल येथे प्रमुख चौकांत सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला.

वडेल येथील ग्रामपंचायत, मुख्य ठिकाणी‌ या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले. दरम्यान भविष्यात गावातील इतर प्रमुख भागांतही सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत.

"गावातील नागरिकांची सुरक्षितता तसेच गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी सीसीटीव्हीची अत्यंत गरज होती. त्याच पार्श्वभूमीवर गावातील चौपाटीच्या मुख्य आवारात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. गावातील प्रत्येक हालचालीवर करडी नजर असेल." - नरेंद्र सोनवणे, सरपंच, वडेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT