cctv esakal
नाशिक

नाशिक : जिल्हा परिषदेत विभागातील CCTV कॅमेरे अलर्टवर!

विक्रांत मते

नाशिक : जिल्हा परिषदेत (ZP) लाचलुचपत विभागाच्या (Bribery Department) अधिकाऱ्यांच्या वाढलेल्या चक्र व त्यातून अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले जात असल्याने मोठ्या प्रमाणात बदलीला सामोरे जावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांनी तातडीची बैठक घेत विभागांमधील सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) तातडीने सुरू करण्याचे अधिकार यांना आदेशित केले. मात्र कॅमेऱ्यासाठी आर्थिक तरतूद नसल्याने निधीसाठी शोधाशोध करावी लागणार असल्याची बाब मात्र अधिकाऱ्यांनी लपवून ठेवली. (CCTV cameras in Zilla Parishad department on alert Nashik News)

जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता अमोल घुगे यांना देयके तयार करून देण्याच्या बदल्यात दीड लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्यापूर्वी माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांना आठ लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले होते. लाचखोरी मुळे जिल्हा परिषद प्रशासन चांगलेच चर्चेत आले आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी फैलावर घेतले. जिल्हा परिषदेतील विविध विभागात वॉच ठेवण्यासाठी लावण्यात आलेले कॅमेरे तत्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले. सर्व विभागात कॅमेरे लावावे, लाच प्रकारामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होत असल्याचे अधोरेखित करताना त्यांनी अडवणूक करू नका, कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT