धुळे टुडे २ साठी...(शिल्लक)
---
फोटो- NSK26H34555 (कुणाल कानकाटे)
---
एक करंजी शेतकरी बांधवांसोबत
---
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर युवासेनेचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ६ : दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी व त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी युवासेनेतर्फे (उबाठा) यंदा शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. यासाठी ‘एक करंजी शेतकरी बांधवांसोबत’ हा विशेष उपक्रम राबविणार असल्याची माहिती युवासेना विस्तारक तथा जिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे यांनी दिली.
बळीराजा हा संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सण- उत्सवाच्या काळात या कष्टकरी कुटुंबांच्या घरात निराशेचे सावट राहू नये, यासाठी युवासेनेने सामाजिक बांधीलकी जपण्याचे ठरवले आहे. अनावश्यक भडक उत्सव टाळून, कार्यकर्ते थेट शेतीच्या बांधावर आणि शेतकऱ्यांच्या दारी जाऊन त्यांच्यासोबत फराळ व आनंद वाटून दिवाळी साजरी करतील. युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामीण भागातील गरजू व शेतकरी कुटुंबांची भेट घेऊन त्यांना दिवाळीचा फराळ व आपुलकीची करंजी देतील. केवळ औपचारिक भेट न देता, बळीराजाच्या सुख- दुःखात सहभागी होऊन त्यांना सामाजिक व भावनिक आधार देण्याचा प्रयत्न केला जाईल. उत्सवाचा खरा आनंद हा वंचितांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात असतो, हा संदेश या उपक्रमाद्वारे दिला जाईल. शेतकरी बांधव संकटात असताना आपण शांत बसू शकत नाही. यंदा दुष्काळाची झळ बसलेल्या आपल्या बळीराजाला एकाकी वाटू नये, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे. एक करंजी शेतकरी बांधवांसोबत या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या दारी जाऊन आनंद वाटणार आहोत. जिल्ह्यातील सर्व युवासेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व नागरीकांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. कानकाटे यांनी केले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.