dashkriya vidhi spot
dashkriya vidhi spot e-sakl
नाशिक

दशक्रिया विधी चौथराच ‘मृत्युशय्येवर’! पिंडदानाच्या ठिकाणी नागरिकांची कसरत

उत्तम गोसावी

ओझर (जि. नाशिक) : येथील महामागार्गाच्या चौपदरीकरणात व बाणगंगा पुलाच्या रुंदीकरणात पुलाखालील मारवाडी समाजाचे मारुती मंदिर(Temple), तर नामशेष झालेच, शिवाय पारंपरिक गायमुखदेखील नामशेष(Extinct) झाले. आता ही जागा तोकडी पडू लागली आहे. अशातच दशक्रिया विधीच्या दिवशी पिंडदान करण्यासाठीचा चौथरा निखळू पाहत आहे. (The place of Pindana of Dashakriya has been broken)

दशक्रिया विधींचे प्रमाण वाढले

माजी आमदार श्रीमती मंदाकिनी कदम यांच्या प्रयत्नाने व दिवंगत खासदार ॲड. उत्तमराव ढिकले यांच्या निधीतून दशक्रिया विधी शेड उभारण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या लोकप्रतिनिधींनी शासन निधीतून भिंत पाडून डागडुजी केली. आता ही निवारा शेड मोकाट जनावरांचे आश्रयस्थान झाली आहे. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत झाले; परंतु गावाच्या समस्या काही सुटल्या नाहीत. अनेक वाडी-वस्त्या आणि लाखाच्या वर लोकसंख्येने विस्तारलेली नगरे पाहता दररोज एक तरी दशक्रिया विधीचा कार्यक्रमत असतोच. कोरोनाच्या(corona) संकटात तर दशक्रिया विधींचे प्रमाणही वाढले.

दशक्रिया विधीच्या दशपिंडाचा प्रश्‍न तसाच

येथील स्मशानभूमी आणि दशक्रिया विधीची जागा विकसित करण्यासाठी स्व. रतनकाका भट्टड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन काही लोकप्रतिनिधी, सहकारी संस्था आणि सामाजिक दायित्व जोपासणाऱ्यांना बरोबर घेऊन हा मुद्दा पुढे आणला होता. अंत्यविधी स्मशानभूमी दुरुस्तीसाठी एचएएलने २०१६-१७ मध्ये सामूहिक सामाजिक उत्तरदायित्व योजनेंतर्गत (वायुयान विभाग) वॉल कंपाउंडचे काम ७ मार्च २०१७ ला पूर्ण केले होते. २०१७-१८ मध्ये भक्कम निवारा शेडचे उत्कृष्ट काम करून त्यास दिशा दिली. ओझर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेने सुमारे सहा लाख रुपयांची मदत देऊन पेव्हर ब्लॉक(Paver block) व आनुषंगिक कामे केली. मारुती ग्रामीण पतसंस्थेने मुख्य प्रवेशद्वारावर कॉलीसीबल गेट व यांसारख्याच सहकारी संस्थांनी आर्थिक मदत देऊन हातभार लावला आहे; परंतु दशक्रिया विधीच्या दशपिंडाचा प्रश्‍न तसाच मागे पडत आहे. ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाले. आता या दशक्रिया विधी चौथऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी जनसेवा मंडळाचे सदस्य चंद्रशेखर असोलकर, जाफर युसूफ पठाण, प्रकाश शिवले, शिवाजी गवळी, गणेश धोत्रे, शब्बीर खाटीक, महेंद्र मोरे यांनी केली आहे.

''महामार्गाच्या रुंदीकरणात दशक्रिया विधीची जागा तोकडी पडत असून, दशपिंड पाडण्याच्या चौथऱ्याचे दगड चारही बाजूंनी निखळत आहेत. प्रशासनाने या सार्वजनिक प्रश्‍नांकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.''

-श्यामराव उगले, संस्थापक अध्यक्ष, जनसेवा मंडळ, ओझर (मिग)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेसच्या काळात मराठवाड्याचा विकास रखडला होता - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT