नाशिक

कुंभमेळ्यातून होणार ‘जनगणना २०२७’चा प्रचार

CD
टूडे साठी -------------- कुंभमेळ्यातून होणार ‘जनगणना २०२७’चा प्रचार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या गर्दीच्या अनुषंगाने केंद्र सरकारतर्फे ‘जनगणना २०२७’ चा व्यापक प्रचार करणार आहे. देशभरातून लाखो भाविक कुंभासाठी येणार असल्याने याच व्यासपीठावरून जनगणनेचा संदेश देण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाच्या जनगणना संचालनालयाने दिले आहेत. मुख्य प्रधान जनगणना अधिकारी तथा सहसचिव डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांना याबाबत पत्र पाठवले आहे. महाराष्ट्रात जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष मोजणी फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार असून, त्यासाठी जनजागृती गरजेची असल्याचे पत्रात नमूद आहे. कुंभमेळा परिसरातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या एलईडी स्क्रीन, डिजिटल डिस्प्लेवर जनगणनेचे संदेश दाखवणे, लेझर-शो आणि ध्वनी- प्रकाश कार्यक्रमात माहिती देणे, शासकीय कार्यालये, महापालिका परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी फलक, बॅनर लावणे, तसेच संकेतस्थळ आणि समाज माध्यमांवरून प्रचार करणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाशी समन्वय साधावा, असेही निर्देश आहेत. प्रचाराचे अधिकृत साहित्य जनगणना आयुक्त कार्यालयाकडून दिले जाणार असून, जिल्हा प्रशासन आणि महापालिकेत समन्वयासाठी नोडल अधिकारी नेमण्याची विनंती करण्यात आली आहे. --------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार? आता नवीन तारीख, मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष

IND vs NZ 1st T20I : भुवनेश्वर कुमार पुढच्या सामन्याला मुकणार? १६व्या षटकात नेमके काय घडले? Video Viral; बघा पुनरागमन कसे राहिले

सेट नाही खरा आहे 'दृश्यम'च्या विजय साळगावकरचा बंगला; ८५ वर्षीय महिला करतेय देखभाल, तुम्हाला पाहायचाय? हा घ्या पत्ता

डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले! बनावट गुणपत्रक अन् खोटी कागदपत्रे तयार करत...; BAMS प्रवेशाच्या नावाखाली तरुणाची ८ लाखांची फसवणूक

Latest Marathi News Live Update : तहसीलदारांना पुलाखाली फेकण्याची धमकी, बच्चू कडूंसह सहा जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT