पान ३ साठी
-------------
३६-२
जनगणनेतील गृहयादी
गटांच्या नोंदीत विसंगती
तातडीने दुरुस्तीचे आयुक्तांना निर्देश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.३० ः जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील गृहयादी व गृहगणनेच्या कामामध्ये मोठ्या त्रुटी आढळून आल्या आहेत. काही गृहयादी गटांची नोंद एका प्रभागात दाखवण्यात आली असताना त्याची प्रत्यक्ष सीमा निश्चिती दुसऱ्याच प्रभागात करण्यात आल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जनगणना कार्य संचालनालयाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून या त्रुटी तातडीने दूर करण्याचे आदेश दिले.
राज्य जनगणना संचालनालयाचे सहायक संचालक सुनील आत्राम यांनी हे पत्र जारी केले आहे. पहिला टप्पा जून २०२६ मध्ये पूर्ण झाला असून या टप्प्यात ग्रामीण भागातील गावांचे आणि शहरी भागातील प्रभागांचे गृहयादी गटांमध्ये विभाजन करण्यात आले होते. या गटांची निर्मिती एका संगणकीय प्रणालीवर करण्यात आली होती. त्यांचे नकाशावरील सीमा निश्चिती दुसऱ्या प्रणालीवर करण्यात आली होती. मात्र पडताळणी दरम्यान दोन्ही प्रणालीवरील माहितीमध्ये तफावत असल्याचे आढळले. काही ठिकाणी अतिरिक्त गट तयार झाले असून काही गट ओसाड असल्याचेही निदर्शनास आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणी अचूक व्हावी यासाठी गृहयादी गटांची माहिती अद्ययावत असणे आवश्यक असल्याने संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष पाहणी करून दुरुस्ती करावी आणि त्याचा अहवाल संचालनालयाकडे सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.