केंद्रप्रमुखावर ४ अपत्ये असल्याच्या
तक्रारीनंतर चौकशी करण्याचे आदेश
--------
लहान कुटुंबाचे खोटे दाखले देऊन नियुक्ती मिळविल्याचा संशय
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता.३१ : यावल तालुक्यातील फैजपूर येथील उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख गौस खान हबीबुल्ला खान यांच्या नियुक्तीबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. लहान कुटुंबाचे खोटे दाखले देऊन केंद्रप्रमुखपदाची नियुक्ती मिळविल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहेत.
भुसावळ येथील अभिजीत दगडू आढाव यांनी यासंदर्भात तक्रार अर्ज सादर केला होता. त्यानुसार, संबंधित केंद्रप्रमुखांना ३ एप्रिल २०२३ला केंद्रप्रमुखपदासाठी समुपदेशन देण्यात आले होते. मात्र, त्यांनी लहान कुटुंबाचे खोटे दाखले सादर करून अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचे तक्रारीत नमूद आहे. संबंधित केंद्रप्रमुखांना एकूण ४ अपत्ये असल्याचे निदर्शनास आल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीची दखल घेत जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २८ ऑक्टोबर २०२६ला यावल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. संबंधित केंद्रप्रमुखांची सखोल चौकशी करून वस्तुनिष्ठ चौकशी अहवाल तीन दिवसांच्या आत कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते व संबंधित केंद्रप्रमुखांच्या नियुक्तीबाबत कोणती कारवाई होते, याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.