rice
rice esakal
नाशिक

Nashik News: बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर केंद्र सरकारकडून बंदी!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्यासंबंधीची अधिसूचना आज परराष्ट्र व्यापार महासंचालनालयातर्फे जारी करण्यात आली.

या अधिसूचनेच्या अगोदर जहाजामध्ये बिगर बासमती पांढरा तांदूळ भरण्यास सुरवात झाल्यास त्यास निर्यातीची परवानगी राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. (Central government bans export of non basmati white rice Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मध्यम, पूर्ण ‘मील्ड', पॉलिश अथवा चकचकीत केलेला नसलेल्या अशा सगळ्या प्रकारच्या बिगर बासमती पांढऱ्या तांदळावर निर्यातबंदी लागू करण्यात आली आहे. देशातील भात उत्पादक भागातील मॉन्सूनच्या पावसाअभावी गेल्या दहा दिवसांमध्ये भाताच्या भावात वृद्धी झाली आहे.

भाववाढीवरील निर्बंधामुळे ही निर्यातबंदी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तांदळाच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होणार आहे. देशातील भावावर नियंत्रण येईल, परंतु निर्यात होणाऱ्या देशांमधील तांदळाच्या भावात वाढ होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

शिवाय अल निनोच्या कारणास्तव इतर देशांमधून निर्यात झालेल्या तांदळाच्या भावात वाढ झालेली आहे. दरम्यान, मॉन्सूनच्या पावसाने जोर धरल्याने भारतातील भात उत्पादक भागामध्ये भाताच्या लागवडीला वेग येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT