Central committee inspecting soybean millets burnt due to lack of water at Khambale Bhokani.  esakal
नाशिक

Nashik News: साहेब, दुष्काळाने होरपळलो, कांदा निर्यातबंदीने उद्ध्वस्त झालो; पाहणी दौऱ्यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा

सकाळ वृत्तसेवा

विकास गीते : सकाळ वृत्तसेवा

Nashik News: केंद्र सरकारच्या पथकाने गुरुवारी सिन्नर तालुक्यातील खोपडी, भोकणी, खंबाळे, दोडी निराळे, मानोरी, शेतावर जाऊन अधिकाऱ्यांनी दुष्काळाची पाहाणी केली.

या केंद्रीय पथकात केंद्रीय कृषी सचिव प्रिया रंजन यांच्या नेतृत्वाखाली नीती आयोगाच्या सदस्यांसह विविध विभागांच्या प्रमुखांचा पथकात समावेश होता. पथकाच्या दौऱ्यानिमित्त महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (central government team visited farm in Sinnar taluka on and officials observed drought nashik news)

चालू वर्षी पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळी सावट आहे. पुरेशा पावसाअभावी बाजरी, मका, सोयाबीन अन्य पिकांना फटका बसला आहे, टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जातोय. परिणामी ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

नाशिकप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील अन्य जिल्हे, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत दुष्काळ आ वासून उभा ठाकला आहे. यामुळे सिन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकात आलेल्या अधिकाऱ्यांना दुष्काळाची आपबिती सांगितली.

शेतकऱ्यांवर एकाचवेळी सुलतानी व अस्मानी संकट कोसळले आहे. खरीप हंगाम पूर्ण वाया गेला असून पाण्याअभावी रब्बीचा हंगामही धोक्यात आहे. कष्टाने पेरलेली पिके डोळ्यांसमोर जळून खाक झाली. साहेब, दुष्काळाने होरपळलो..... आता कांदा निर्यातबंदीने पुरते उद्ध्वस्त झालो आहोत.

पुन्हा उभे राहण्यासाठी शासनाच्या मदतींचा आधार उरल्याची व्यथा मांडत सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाहणी दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय दुष्काळ निवारण समितीपुढे गंभीर दुष्काळी परिस्थितीचे वास्तव मांडले. गुरुवारी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान सदस्यीय केंद्रीय दुष्काळ निवारण समिती तालुक्यात दाखल झाली.

समितीने खोपडी गावापासून पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी सुरू केली. थेट बांधावर पोहोचून समितीचे प्रमुख प्रियरंजन व चिराग भाटिया यांनी शेतातील वाळलेल्या मका, बाजरी पाहणी केली. यानंतर दोडी खंबाळे काही शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

लागवड खर्च, उत्पादनाचे नुकसानीची माहिती घेतली. दुष्काळाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना केंद्राने कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला.

या शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी

भोकनी : सुखदेव कारभारी सानप, मुरलीधर सांगळे, किसन कुराडे

खोपडी : शैला नामदेव अलगट

खोपडे : भीमा गंगाराम दराडे

खंबाळे: विष्णू दशरथ आंधळे

खंबाळे: शिवाजी एकनाथ खाडे

खंबाळे: शेतकऱ्यांचे वस्ती गायकर वस्ती बिरोबा वाडी

जोडी विहीर मानोरी : शेतकऱ्यांचे शेततळे निरह्ळे ड्रिंकिंग वॉटर सप्लाय वस्ती आदी

प्रियरंजन यांनी असे सांगितले की केंद्र सरकारला अहवाल पाठविणार आहे. या पाहणी दौऱ्यात केंद्रीय अधिकारी प्रियरंजन, प्रांत अधिकारी हेमांगी पाटील, सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख, कृषी अधिकारी नाठे, गटविकास अधिकारी महेश पाटील, भोकणी गावचे सरपंच अरुण वाघ सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT