नाशिक

आदिवासी सेंट्रल किचनच्या कामकाजाची चौकशी

CD
आदिवासी सेंट्रल किचनच्या कामकाजाची चौकशी नऊ सदस्यीय समितीची स्थापना, ३० ऑक्टोबरपर्यंत अहवाल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : आदिवासी विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या भोजनाची गुणवत्ता आणि या यंत्रणेच्या एकूण कामकाजाची तपासणी करण्यासाठी शासनाने नऊ सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीला ३० ऑक्टोबरपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सेंट्रल किचनच्या कामकाजाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्‍नानंतर त्याविरोधात आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या आहाराशी संबंधित तक्रारींची अधिकृत पातळीवर तपासणी होणार आहे. मात्र, चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर झाल्यानंतरच आहाराच्या गुणवत्तेबाबत आणि सेंट्रल किचनच्या कामकाजातील त्रुटींबाबत ठोस निष्कर्ष समोर येतील. त्यामुळे समिती नेमकी कोणती निरीक्षणे नोंदवते आणि त्यानंतर शासन कोणती पावले उचलते याकडे संबंधितांचे लक्ष्य लागले आहे. चौकशीदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात कोणत्या प्रकारचा आहार दिला जातो, भोजनाची चव व गुणवत्ता कशी असते, अन्न वेळेवर मिळते का आणि भोजनाबाबत काही अडचणी येतात का, यांसारख्या बाबी तपासल्या जाणार आहेत. चौकशीत पालकांचे म्हणणेदेखील ऐकून घेतले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत त्यांच्या काही तक्रारी किंवा सूचना असल्यास त्यांची नोंद घेतली जाणार आहे. नऊ सदस्यीय समितीला ३० ऑक्टोबरपर्यंत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा अहवाल विकास आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लडाख आमचाच! भारताने २८ ठिकाणांची नावे जाहीर करताच चीनची आडमुठी भूमिका, नामकरणाला विरोध

दिल्लीत १५ वर्षांच्या मुलांमध्येही GI कॅन्सर! वायुप्रदूषण ठरतंय का छुपा धोका? वाचा डॉक्टर काय सांगतात

IndiGo Flight Cancellation: इंडिगोचा मोठा निर्णय! 'त्या' देशाकडे जाणारी उड्डाणे १७ ऑक्टोबरपर्यंत रद्द

Latest Marathi News Live Update: पार्थ पवार यांनी शेतकरी व सभासदांशी साधला संवाद; विजयाबद्दल मानले आभार

Manchar News : अवसरी खुर्द येथील सरकारी ओढ्यावरील अतिक्रमण हटविले; महसूल विभागाची मोठी कारवाई, शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT