centre minister Bharti Pawar mothers Mangalsutra stolen by chain snatchers in nashik crime news rak94 
नाशिक

Nashik Crime News : नाशिकमध्ये गुन्हेगारी शिगेला! चोरट्यांनी पळवलं केंद्रीय मंत्र्यांच्या आईचे मंगळसूत्र

रोहित कणसे

नाशिक येथे चक्क केंद्रीय मंत्र्यांच्या आईचं मंगळसूत्र चोरट्यांने पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या आरटीओ परिसरात बाईकवर आलेल्या चोरट्यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईचं मंगळसूत्र पळवलं. बाईकवरून आलेल्या चोरांनी दोन ते अडीच तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावल्याची घटना घडल्याने नाशिक शहरात सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मातोश्री शांताबाई बागुल या सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास भाजीपाला घेण्यासाठी परिसरात असलेल्याच भाजी मार्केटमध्ये जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातली सोन्याची पोत हिसकावली. यावेळी परिसरामध्ये जास्त वर्दळ नसल्यामुळे कोणाला आवाज देता आला नाही असे शांताबाई बागुल यांनी सांगितलं. दरम्यान चेनस्नॅचिंगच्या या घटनेमुळे नाशिक शहरातील गुन्हेगारीने कळस गाठल्याच पाहायला मिळत आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिकच्या आरटीओ ऑफिस परिसरातील दुर्गा नगर येथे घडलेल्या या प्रकाराबद्दल भारती पवार यांच्या मातोश्रींनी स्वतः माहिती दिली. त्यांनी माझ्या गळ्यात हात टाकला. पोत हिसकून घेतली. पोत गेल्याचं मला कळलं. ते हळूहळू निघून गेले. पण त्यावेळी तिथे कोणी माणसेच नव्हती. ते पुढे जाऊन वळाले आणि बघत होते मी काही ओरडते का ते. पण मला काहीच सुचेनासे झाले. दोघेही स्कूटीवर आले होते, अशी माहिती भारती पवार यांच्या आईंनी साम टीव्हीशी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

Latest Marathi News Live Update : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन येत्या ११ जूनला होणार

Property Card Maharashtra : महापालिका क्षेत्रातील 7/12 उतारे बंद; मिळकतपत्रिका देण्याचा निर्णय, शहरातील जमिनींसाठी 'प्रॉपर्टी कार्ड' व्यवस्था लागू

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

SCROLL FOR NEXT