ZP CEO Ashima Mittal, Nashik News esakal
नाशिक

Nashik ZP News : मुखेड वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; मित्तल यांनी बजावल्या नोटिसा

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी येवला तालुक्यातील मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक दिलेल्या भेटीत अनियमितता आढळली असल्याचे प्राप्त झालेल्या अहवालातून निष्पन्न झाले आहे.

यावर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दोषी असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. (ceo Ashima Mittal announced action against guilty medical officers and staff nashik news)

वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार बाविस्कर यांचा पदभार काढून घेत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्रातील इतर कर्मचाऱ्यांनाही नोटीस देत खुलासा मागविला.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी काल (ता. १०) येवला दौऱ्यावर असताना मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. येथील कामकाजात अनियमितता आढळल्याने डॉ. पवार यांनी तत्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून या गैरप्रकाराबाबत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार, श्रीमती मित्तल यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांना, चौकशी करीत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार समितीने काल प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. पाहणी केलेला अहवाल मंगळवारी (ता. ११) श्रीमती मित्तल यांना सादर करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. बाविस्कर यांचे कार्यालयीन कामकाजात दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे त्यांचा कार्यभार नियमित वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमीत लगडे यांच्याकडे सोपविण्यात यावा. तसेच, दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात यावी, केंद्रात यापूर्वी कार्यरत मनोज महाले (औषधनिर्माण अधिकारी) यांनी चार्ज देताना रजिस्टर अद्ययावत करून दिलेले नाही.

त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात यावी, तसेच सद्यस्थितीत कार्यरत दीप्ती केदार (औषधनिर्माण अधिकारी) यांना बीएसएल स्ट्रीपची संख्या व लाभार्थी यांचा हिशेब लागत नसल्याने कारणे दाखवा नोटीस द्यावी, यापूर्वी कार्यरत जाधव (ओपीडी एएनएम) या कार्यरत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी शिफारस करण्यात आली.

त्यानुसार, श्रीमती मित्तल यांनी तातडीने शिफारस केल्याप्रमाणे कारवाई केली आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची सभा घेऊन सर्वसामान्य सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच, तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत योग्य त्या सूचना देण्यात आल्या असल्याचे डॉ. बागूल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT